(Source: Poll of Polls)
Solapur News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सोलापुरातील गावकरी आक्रमक, भाजपला निर्वाणीचा इशारा
मराठ्यांना छळण्याचं काम फडणवीसांनी केलं असून आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. प्रचाराची गाडी गावात आल्यास मदत करणार नाही, मराठा समाज भाजपला मदत करणार नाही, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुद्यावरून सोलापुरातील (Solapur News) कोंडी ग्रामस्थांनी सामूहिक शपथ घेतली आहे. मराठ्यांचा छळ करणारे राज्यकर्ते जोपर्यंत भाजपमध्ये आहेत तोपर्यंत भाजपला सहकार्य नाही, अशी भूमिका कोंडी ग्रामस्थांनी घेतली आहे. भाजपसह त्यांचे मित्रपक्ष आणि पक्षातील कोणत्याही नेत्यांना कोंडी ग्रामस्थ सहकार्य तसेच मतदान करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. कोंडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून मराठा बांधवानी शपथ घेत भाजपला मदत न करण्याचा निर्धार केला. कोणतीही निवडणूक असूदे प्रचाराची गाडी गावात आल्यास मदत करणार नाही, मराठा समाज भाजपला मदत करणार नाही, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
दरम्यान, फडणवीस यांचा महिला कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे, हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता. एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचं काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही', असा गंभीर आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, मी हॉस्पिटल मधून बाहेर का आलो? दवाखान्यात अॅडमिट असल्यावर चौकशी होत नाही, लोक चौकशीसाठी दवाखान्यात पळून जातात, पण मी मुद्दाम एसआयटीच्या चौकशी साठी बाहेर आलो, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटील यांनी आज बीड जिल्ह्यातील वानगाव फाटा इथं बोलताना फडणवीसांवर तोफ डागली.
फडणवीस यांनी पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यामध्ये मराठा द्वेष ठासून भरला आहे. त्यांच्या सांगण्यावरून बॅनर बोर्ड काढले जात आहेत. पोलिस बोर्ड काढत आहेत, बोर्ड का काढलेत, त्यात गोळ्या घाला लिहिले आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे. बोर्ड काढल्यामुळे लोक नाराज होऊ लागलेत, तुम्हाला तुमचे बोर्ड तर, लावावे लागतील ना, असंही जरांगेनी म्हटलं आहे
इतर महत्वाच्या बातम्या