Skin Care Tips: त्वचा निरोगी, मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो, अनेकजण एकाहून एक महागडी सौंदर्य उत्पादनं (Beauty Products) वापरतात. चेहरा सुंदर (Beautiful Skin) दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लेप आणि फेसपॅक लावले जातात. अनेक घरगुती उपाय केले जातात, पण तरीही अनेक वेळा त्वचेशी संबंधित समस्या सतावू लागतात. इतकी काळजी घेऊनही त्वचेच्या समस्या कशा उद्भवतात? असा विचार लोक करू लागतात. तर, केवळ चांगली उत्पादनं वापरून आणि फेसपॅक लावून त्वचा निरोगी ठेवता येत नाही. तुम्हाला चेहरा निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन चुकाही सुधाराव्या लागतील, ज्यामुळे त्वचा खराब होते.


त्वचेची काळजी घेताना आपण अनेकदा अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्या उद्भवू लागतात, जसे की चेहऱ्यावर टॉवेल वापरणे. अनेकजण चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने तोंड पुसतात. असे बरेच लोक आहेत ज्यांचा टॉवेल खूप घाण राहतो, तरीही ते बेफिकीरपणे तो चेहऱ्यावर वापरतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टॉवेलमुळे देखील तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.


टॉवेलमधील बॅक्टेरिया त्वचेत प्रवेश करू शकतात


मिररच्या रिपोर्टनुसार, त्वचा आणि सौंदर्योपचार चिकित्सक फातमा गुंडूज यांनी सांगितलं की, टॉवेलने चेहरा पुसल्याने त्वचेवर वाईट परिणाम होतो. कारण टॉवेलमध्ये E.coli (Escherichia coli) सारखे धोकादायक जीवाणू आढळतात. जेव्हा तुम्ही टॉवेलने तुमचा चेहरा पुसता तेव्हा त्यातून E.coli बॅक्टेरिया तुमच्या त्वचेत प्रवेश करू शकतात.


खडबडीत टॉवेल वापरू नका


फक्त बॅक्टेरियाच नाही, तर टॉवेलचा खडबडीत भागही त्वचेला हानी पोहोचवण्याचं काम करतो. कारण चेहरा पुसताना अशा टॉवेलमुळे त्वचा घासली जाते, यामुळे त्वचेवर लहान रेघा येऊ शकतात आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही चेहरा पुसण्यासाठी टॉवेल देखील वापरू नये, कारण ते तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल काढून टाकू शकते, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. चेहरा पुसण्यासाठी नेहमी मऊ टॉवेल किंवा कापड वापरा आणि चेहरा घासून पुसण्याऐवजी टॅप करुन वरच्या वर पुसा.


उशीचा मळालेला कव्हर देखील ठरू शकतो हानीकारक


आपण रोज एकच उशी घेऊन झोपतो. या उशीला आपल्या केसांचा तेलकटपणा, कोंडा सतत लागतो, जो डोळ्यांना तितका दिसत नाही. झोपेत आपला चेहरा देखील उशिच्या संपर्कात येतो आणि त्यातील बॅक्टेरियामुळे त्वचेवर मुरुम येतात. हे टाळण्यासाठी उशिचे कव्हर दर आठवड्याला धुतले पाहिजे.


हेही वाचा: