Monsoon Tips: पावसाळ्यात प्रत्येक महिलेच्या बॅगेत असाव्यात 'या' गोष्टी; कोणत्याही वेळी भासू शकते गरज
सनस्क्रीन - पावसाळा या ऋतुत सुर्याचा प्रकाश काहीवेळा हानीकारक असतो, त्यापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन बॅगेत ठेवणं गरजेचं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्री - पावसाळ्यात छत्री नेहमी आपल्या बॅगेत असावी. अचानक पाऊस आल्यास तुम्ही भिजू नये म्हणून हे गरजेचं आहे.
नॅपकीन - काहीवेळा छत्री वापरुन देखील आपले अंग पाण्याने भिजते. त्यामुळे अंग पुसण्यासाठी छोटा रुमाल किंना नॅपकीन नेहमी बॅगेत ठेवावी.
सुका कपडा/टिशू पेपर - अनेक महिला ऑफिसला जाण्यासाठी बस, ट्रेन, किंवा रिक्षातून प्रवास करतात. पावसाळ्यात पाण्यामुळे खिडकीजवळील सीट ओल्या होतात, अशा वेळी सुका कपडा किंवा टिशू पेपर सोबत ठेवल्यास सीट पुसून तुम्ही कोरड्या जागेवर बसू शकता.
बँड-एड - पावसाळ्यात आपण पावसाळी चपला वापरतो आणि अनेकदा त्या प्लास्टिकच्या किंवा रबरच्या असल्याने पायाला त्या लागतात आणि जखमा होतात. हे टाळण्यासाठी बॅगेत बँड-एड (Band-Aid) नेहमी ठेवावे.
फेविक्विक - अचानक पावसात चप्पल तुटली तर प्रॉब्लम होऊ शकतो, त्यामुळे अशा वेळी तात्पुरता उपाय म्हणून बॅगेत फेविक्विक नेहमी असावा.
पाण्याची बॉटल - शरीराला नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पित राहणं गरजेचं असतं, त्यामुळे बॅगेत नेहमी पाण्याची बॉटल ठेवावी.
परफ्युम - पावसाळ्यात वातावरणात दमटपणा असतो, त्यामुळे अंगाला सतत घाम येतो. घामामुळे अंगाला वास येतो, अशा वेळी बॅगेत नेहमी परफ्युम किंवा डिओड्रंट स्प्रे ठेवावा.
कपड्याचा जोड - पावसाळ्यात कधी कधी कपडे फार भिजतात आणि ओल्या कपड्यांवर दिवसभर राहिल्यास इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी बॅगेत नेहमी कपड्याचा एक जोड ठेवावा.
पॉवर बँक - तुम्ही पावसाच्या वेळी ट्राफिकमध्ये अडकला किंवा एखाद्या अडचणीत अडकला आणि फोनला पुरेशी चार्जिंग नसेल तर प्रॉब्लम होऊ शकतो, त्यामुळे बॅगेत पॉवर बँक नेहमी कॅरी करावी.
टॅल्कम पावडर - पावसाच्या दिवसात बॅगेत चेहऱ्याची पावडर नेहमी कॅरी करावी. पावसामुळे चेहरा चिकट किंवा तेलकट होतो, अशा वेळी टॅल्कम पावडरचा वापर होतो.
लिपस्टिक - पावसाच्या पाण्यामुळे लिपस्टिक कधी कधी पुसली जाते, त्यामुळे एक मॅट लिपस्टिक महिलांनी नेहमी बॅगेत ठेवावी.