Black Panther : सह्याद्रीच्या पर्वतरांगात चार ब्लॅक पँथरचं अस्तित्व
Black panther in kokan : सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आठ पट्टेरी वाघांबरोबर चार ब्लॅक पँथर या दुर्मीळ प्रजाती आतापर्यंत दिसल्याने प्राणीसंपदेच्या समृद्धतेने सह्याद्री संपन्न झाला आहे.
Black Panther In Konkan : सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आठ पट्टेरी वाघांबरोबर चार ब्लॅक पँथर या दुर्मीळ प्रजाती आतापर्यंत दिसल्याने प्राणीसंपदेच्या समृद्धतेने सह्याद्री संपन्न झाला आहे. काळा बिबट्या हा अत्यंत दुर्मीळ बिबट्या असून त्याचे निसर्गातील वास्तव्य हे कोकणच्या जंगलाचे परिपूर्णतेचे प्रतीक आहे. सिंधुदुर्गात आतापर्यंत कुडाळ जवळील गोवेरी, भैरवगड परिसर, आंबोली आणि तिलारीच्या जंगलात यापूर्वी ब्लॅक पॅंथरच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. तर पश्चिम घाटात पट्टेरी वाघांचे अस्तित्वही आढळले आहे. सिंधुदुर्गातील आंबोली जवळील हिरण्यकेशी येथे यापूर्वी पट्टेरी वाघ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पट्टेरी वाघांबरोबरच दुर्मीळ ब्लॅक पँथरचा अधिवास असल्याने जैवविविधतेत भर पडली आहे. हा ब्लॅक पॅंथर ताडोबा राष्ट्रीय उद्यान, सिंधुदुर्गात तिलारी, आंबोली यासारख्या घनदाट जंगलात सापडतो. मात्र, गोवेरीसारख्या कमी जंगलाच्या ठिकाणी मिळालेल्या ब्लॅक पँथरमुळे जिल्ह्यात अशा दुर्मीळ वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण असून जिल्ह्यातील जैवविविधता वैभवशाली असल्याचे समोर झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघासोबत ब्लॅक पॅंथरच अस्तित्व या अगोदर अधोरेखित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जैवविविधतेत भर पडून ब्लॅक पॅंथरच आणि वाघाचं संवर्धन होत असतानाच त्यांची संख्या वाढते ही एक महत्त्वाची पर्यावरणातील बाब आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काळा बिबटचा आढळ असल्याचं स्पष्ट झालं आहे. ब्लॅक पॅंथर किंवा काळा बिबट्या कोणतीही वेगळ्या प्रकारची प्रजाती नसून ती नेहमी आपल्याला आढळणाऱ्या एक बिबट्याची प्रजाती आहे. त्यामध्ये उपयोगी परिवर्तन होऊन तो काळ्या बिबट्या होतो. पर्यटन वाढीसाठी याचा उपयोग होत असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आले आहे. काळा बिबट्या हा सदाहरित जंगलात आढळतो. कोकणातील जंगल काळ्या बिबट्याला अर्थात ब्लॅक पँथरला उपयुक्त असल्याने याचा अधिवास कोकणातील जंगलात आढळतो.
2014 च्या गणनेनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत. पर्यावरण, वन्यजीव अभ्यासकांच्या मते ही संख्या आठ असल्याचे सांगितले जात आहे. तर आतापर्यंत चार ब्लॅक पॅथरचं अतित्व आढळलं आहे. त्यामुळे कोकणातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील जंगल खऱ्या अर्थाने समृद्ध झालं असं म्हणता येईल.