सिंधुदुर्ग: एसटी कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात गेल्यावर दुय्यम पद्धतीची वागणूक देत असल्याचा आरोप करत आज पणजी-कोल्हापूर बस कणकवली स्थानकात रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर एसटी डेपो मॅनेजर यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत तब्बल एक तास ही बस थांबवून ठेवली होती.


एसटी विभागात कोल्हापूर विरुध्द सिंधुदुर्ग कर्मचाऱ्यां मधील वाद चव्हाट्यावर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बस कोल्हापूर येथे गेल्यानंतर त्या एसटी बस वाहन चालक व वाहक यांना दुय्यम पणाची वागणूक मिळते. त्या ठिकाणी प्रवाशी भरण्यासाठी दिले जात नाहीत. तसेच त्यांची मोबाईल व तिकीट एटीएम मशीन, आत मध्ये रोख रक्कम असणारी काढून घेतली जाते असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.  


सिंधुदुर्ग विभाग एस.टी बस कोल्हापुरात गेल्यावर बस चालकाला दुय्यम पणाची वागणूक देण्यात आली. तसेच मोबाईल आणि तिकिट मशीन कोल्हापूर डेपो मॅनेजर पाटील यांनी आज काढून घेतली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कोल्हापूर एसटी डेपो मॅनेजर विरोधात संताप व्यक्त झाला. सायंकाळी कणकवली बसस्थानकात आलेली पणजी - कोल्हापूर एसटी बस एक तास रोखून धरण्यात आली.


त्यामुळे कणकवली स्थानकात पणजी-कोल्हापूर बस रोखण्यात आली. त्यामुळे कणकवली स्थानकात काही काळ वातावरण तणावाचे झाले. जोपर्यंत आगार व्यवस्थापक येत नाही तोपर्यंत बस सोडली जाणार नाही, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. येथील बस स्थानकात एसटी कर्मचारी कोअर कमिटी अध्यक्ष अंनत रावले, सचिव रोशन तेंडुलकर, गणेश शिरकर आदींसह कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. 


महत्त्वाच्या बातम्या: