TET Exam Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण आता कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. 2019-2020 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी सायबर स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. 56/2029 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ज्यात हे कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, या गैरप्रकाराच्या तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी करताना असे निष्पन्न झाले की, 7880 उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल आहेत. 


शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतिम निकाल 28 ऑगस्ट 2020 रोजी परीक्षा परिषदेच्या स्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. त्यानुसार एकूण 16705 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी अनेक उमेदवार गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले. 293 उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले असल्याचे यात समोर आले. तर उर्वरीत 87 उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात होते, असे आढळून आलेले आहे.


परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, परीक्षा पात्र उमेदवारांच्या यादीत अनेक असेही उमेदवार होते, यांची नावे दोव वेळा पात्र उमेदवार म्हणून या यादीत नोंदवण्यात आली होती. यात 7880 पैकी 6 उमेदवारांची नावे दोनदा नोंदवण्यात आल्याचं दिसून आलं आहे. याप्रकरणातील अनेक उमेदवारांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम 1998 भाग 2 प्रकरण 5 मधील कलम 8 उपनियम (2) (य) मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दोषी उमेदवारांवर शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Cabinet expansion : शुक्रवारी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? कुणाला मिळणार संधी?
Menstrual Hygiene PIL : अस्वच्छ आणि घाणेरड्या स्वच्छतागृहांमुळे विद्यार्थिनींच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन, मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Robot Birds : रोबोट बर्ड घेतोय पंख पसरवून हवेत भरारी, वजन गोल्फ बॉलपेक्षाही हलके