मुंबई : जगभरात एबीपी माझा प्रसिद्ध आहे. गुवाहटीमध्ये असताना आम्ही एबीपी माझाच्या बातम्या पाहिल्या आहेत. एबीपीने बातम्याची विश्वसहर्ता वाढवली आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एबीपी माझाबद्दल गौरवोद्गार काढले. एबीपी माझाच्या माझा सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
एबीपी माझाचा माझा सन्मान 2022 पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौर गोपालदास महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला. लवकरच हा माझा सन्मान सोहळा 14 आणि 15 ऑगस्ट रोजी एबीपी माझावर पाहता येणार आहे
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल
राज्य आणि केंद्र मिळून चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठींबा आहे. हे सर्वसान्यांचे सरकार आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी हे सरकार आले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आमच्या कामात काही त्रुटी आढळल्यास आम्हाला सूचना द्या. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी ग्वाही देखील त्यांनी या वेळी दिली आहे.
माझ्या महाराष्ट्रात माझा मुख्यमंत्री हाच माझा सन्मान : देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझा सन्मान पुरस्कार सोहळ्याला आलो त्यावेळी मुख्यमंत्री होतो. या वेळी उपमुख्यमंत्री म्हणून आलो आहे. पुढच्या वर्षी मी सोहळ्याला येणार नाही. गंमतीचा भाग सोडला तर माझ्या महाराष्ट्रात माझा मुख्यमंत्री हाच माझा सन्मान आहे.
माझा सन्मान पुरस्काराचे मानकरी
- डॉ. संजय ओक, कोविड टास्कचे प्रमुख
- विलास शिंदे, सह्याद्री फार्म्सचे प्रणेते
- विजय रघुवीर, प्रख्यात जादूगार
- अमृता सुभाष, ख्यातनाम अभिनेत्री
- आशुतोष कोतवाल, ख्यातनाम शास्त्रज्ञ
- रितेश देशमुख, अभिनेता
- पंडित सुरेश तळवलकर, तबला उस्ताद
- डॉ. राणी बंग, सामाजिक कार्यकर्त्या
- अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते