Nitesh Rane on Uddhav Thackeray : दुसऱ्यांना गद्धार म्हणवतात मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किती मोठे गद्दार आहे हे जनतेने पाहिलेले आहे. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा भाजपासोबत परत युती करण्यासाठी किती आतुर आहात. ज्यांच्याजवळ स्वतःचा पक्ष नाही. त्यांची भाजपला (BJP) तडीपार करण्याची लायकी आहे का? थोड्या दिवसात हेच हद्दपार होतील. उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान आहेत, असा खरपूस समाचार भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी घेतला आहे.
नितेश राणे म्हणाले की, काल आमच्या कणकवलीत नसबंदी झालेले भटके कुत्रे आले होते. या कुत्र्यांचा त्रास वाढत चाललेला आहे. त्यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी मी केलेली आहे. जिल्ह्यातील जनतेला काल नाहक त्रास झाला. या मतदार संघातील जनता तुमच्या सोबत आहे. ज्यांनी टीका केली त्यांना उत्तर देण्याचे काम आम्ही करू, असे जनतेतून मला सांगण्यात आले.
कालची सभा विनायक राऊतांच्या निरोपाची सभा
विकास कामे आणि होणारे प्रवेश पाहता कालच्या सभेची दखल घेण्याची गरज नाही. मी वातावरण खराब करणार नाही. 2019 साली सुद्धा सभा झाली होती. दुसऱ्यांना गद्धार म्हणवतात मात्र उद्धव ठाकरे किती मोठे गद्धार आहे हे जनतेने पाहिलेले आहे. मागील सर्व निवडणुकीत भाजपला यश आलेले आहे. मागील 10 वर्षात विनायक राऊत यांनी मतदारांसाठी काय केले. याचा हिशोब काल ठाकरेंनी द्यायला हवा होता. कालची सभा ही विनायक राऊतांच्या निरोपाची सभा होती. ही विनायक राऊतांची शेवटची निवडणूक आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
राणे कुटुंबियांचे नाव घेतल्याशिवाय तुमच्या कॉर्नर सभा होत नाहीत
माझ्यावर संघाचे विचार व संस्कार आहेत. त्यामुळे मी कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही. तुम्हाला नितेश राणे नको असेल तर त्याच्या समोर तुमचा पर्याय उभा करा. राणे कुटुंबियांचे नाव घेतल्याशिवाय तुमच्या कॉर्नर सभा होत नाहीत. तुमच्या सभेला गर्दी होत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डीएनएमध्ये राणे किती खोलवर रुजलेले आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे कालची सभा, असेही त्यांनी म्हटले.
तुम्ही भाजपसोबत युतीसाठी आतुर
आगामी निवडणुकीत सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा लोकसभेचा जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला विजयी करण्यात कणकवली मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असेल. उद्धव ठाकरे तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा भाजपासोबत परत युती करण्यासाठी तुम्ही किती आतुर आहात, असेही ते यावेळी म्हणाले.
थोड्या दिवसात हेच हद्दपार होतील
कुठल्या तोंडाने जाहीर सभेत भाजपा आणि मोदींवर टीका करत आहात. इंडिया आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहे. खरंच हा बाळासाहेबांचा मुलगा आहे का? याचा तपास झाला पाहिजे, डीएनए झाला पाहिजे. ज्यांच्या जवळ स्वतःचा पक्ष नाही. त्याची भाजपला तडीपार करण्याची लायकी आहे का? थोड्या दिवसात हेच हद्दपार होतील.
उद्धव ठाकरेंना अशीच माणसं लागतात
भास्कर जाधव यांच्याबाबत नितेश राणे म्हणाले की, व्हिडिओ प्ले केला. भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केलेला व्हिडिओ दाखवला. उद्धव ठाकरेंवर केलेली टीका याचे व्हिडिओ दाखवले. उद्धव ठाकरेंना अशीच माणसं लागतात. जो सन्मान मोदींनी कोकणचा केला. त्यात एकपट सुद्धा उद्धव ठाकरे करू शकत नाही, असेही नितेश राणे म्हणाले.
भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंची नकळत इज्जत काढली
केसरकर यांचे बोलणे स्वागतार्ह आहे. काल जे बोलत होते त्यांचं पण चॅनेल बदलेल. काल स्टेजवर बसलेले अर्धे लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. माझ्यावर काल झालेली टीका जनतेला मान्य नाही. हे आमचं अतूट नाते आहे. आता कॉर्नर सभा घेत आहेत. बायकोला घेऊन फिरावं लागत आहे. काल वैभव नाईक यांच्या घरी वहिनी हिशोबाला बसल्या असतील. भास्कर जाधवही उद्धव ठाकरेंची नकळत इज्जत काढत होते. कार्यकर्त्याची हिंमत होता कामा नये एकेरी नाव घ्यायची. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदी साहेबांना चांगली माहीत आहे. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या रुद्राक्षाची किंमत तरी माहित आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
आम्हाला रोखू शकत नाहीत म्हणून टीका
कुडाळ राडावर नितेश राणे म्हणाले की, आता आमच्या जिल्ह्यात गाव चलो अभियान सुरू आहे. राणे साहेब किंवा भाजपा नेत्यांवर खालच्या पातळीची टीका करत असाल तर कार्यकर्त्यांना आवरण कठीण होत. जनता दरबार घ्यावा खासदार राऊत यांनी काय दिवे लावले ते समजेल. माझ्या मतदारसंघात जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा उबाठाला शिरकाव करू दिला नाही. उबाठाचे सरपंच लवकरच भाजपात येतील. आम्हाला रोखू शकत नाहीत म्हणून टीका करत आहेत. काल विनायक राऊत यांचे प्रगती पुस्तक वाचून दाखवला पाहिजे होते. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी विश्वास दाखवणे योग्य आहे. वैभव नाईक यांची प्रॉपर्टी मोजण्यापेक्षा पक्षाची स्थिती पाहिली पाहिजे होती. उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान आहेत, अशीही टीका नितेश राणे यांनी केली आहे.
आणखी वाचा
Bhaskar Jadhav : "नरेंद्र मोदी राम राम करत जनतेला मरा मरा करतायेत"; भास्कर जाधव कडाडले