Bhaskar Jadhav : अयोध्येमध्ये (Ayodhya) मोठे कटआऊट नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे लावण्यात आले. त्यामध्ये बाल अवस्थेत श्रीराम नरेंद्र मोदी यांचा बोट धरून जाताय. ही श्रीरामाची बाल अवस्थेतील मूर्ती का? कारण सगळ्यात मोठे मोदी त्यांना दाखवयाचे आहे. मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार हे भासावायचे आहे. रामचंद्रमध्ये मोठे की नरेंद्र मोदी मोठे? नरेंद्र मोदी हे राम राम करत जनतेला मरा मरा करत आहेत. त्यामुळे तुम्ही सावध राहा, असा घणाघात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे. रत्नागिरी येथे ठाकरे गटाच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 


भास्कर जाधव म्हणाले की, 1 आणि 2 तारखेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रायगड दोऱ्यावर होते. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले. सभा तसेच प्रमुख स्थळांना भेटी देत आले आहेत. भेटी गाठी आणि इतर कार्यक्रमासाठी या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जनसंवाद असं नाव आहे पण साहेबांचं भाषण ऐकण्याकरीता जनता येत आहे. 


राम मंदिराचा इव्हेंट केला


पंतप्रधान म्हणाले की घराणेशाही संपवायची आहे. तर उद्धव साहेब म्हटले माझ्या घराणेशाहीचा मला अभिमान आहे. कुटुंब संवाद होतायत. आजकाल सर्वांच्या हातात मोबाईल आहे. त्यावरून कळतंय की, कोणते विषय घेतायत आणि ते मांडले जातायत. मला आता महत्वाच्या विषयावर लक्ष वेधायचं आहे की, 22 तारखेला रामाची प्रतिष्ठापणा झाली. आपण त्याच स्वागत केलं. भरभरून आनंद वाहत असताना अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावरून मलाही काही प्रश्न पडले आहेत. राम मंदिराचा इव्हेंट केला. मार्केटिंग तिकडे केलं, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. 


...तर सरकारचे मंत्री कुठे होते?


मला प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही मोठं मार्केटिंग ठेवलंय. त्या कार्यक्रमाचा यजमान कोण? या देशाचा प्रथम नागरिक हा राष्ट्र्पती मूर्मु मॅडम आहेत. त्या त्यावेळी कुठं होत्या. याच उत्तर पंतप्रधान यांनी दिले पाहिजे. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती कुठे होते? तो सरकारी कार्यक्रम होता तर सरकारचे मंत्री कुठे होते? असा सवाल यांनी उपस्थित केला. 


रामाचे राजकारण केलं जातंय


राममंदिर व्हावं म्हणून म्हणून प्रत्येकाच्या घरातील एक एक वीट गेलेली आहे. राम मंदिरामध्ये तुमची कुठेही श्रद्धा नाही. मला प्रश्न विचारायचं आहे भाजपला की, पौष महिन्यात लग्न करायला किंवा बोलणी करायला जाऊ नको लग्न ठरलेलं असलं तरी भेटायला जाऊ देत नाहीत. मग पौष महिन्यात राम चंद्राची का स्थापना केली. पौष महिना अशुभ मानला जातो तर का केलं? याला रामाच राजकारण केलं जातंय, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. 


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला नाही ती कोणाची गॅरंटी?


वंदे भारत ट्रेन सुरु केल्या. त्यालाही इव्हेंट केला जातोय. त्या वंदे भारत ट्रेनमध्ये असं आहे काय? प्रत्येक गोष्टीत इव्हेंट करायचा यांना? रेल्वेला नवीन डबा जोडला तरी झेंडा दाखवायला मोदी असतात. प्रत्येक कामात मोदी असतात. 2 जूनला ओडिसा येथे अपघात झाला होता तेव्हा 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ती कोणाची जबाबदारी ती कोणाची गॅरेंटी? मालवण येथे महाराजांचा पुतळा उभा केला ती मोदी गॅरेंटी मग मुंबईत समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजून झाला नाही ती कोणाची गॅरंटी? असा खरपूस समाचार त्यांनी यावेळी घेतला. 


मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार हे भासवायचेय


प्रभू राम चंद्राची बाल्य अवस्थेतील मूर्ती का अयोध्येत, हे कोणी बघितलं का? कोणी विचार केला का? आपण कुठेही फिरा प्रभू राम चंद्राची मूर्ती मोठ्या अवस्थेत असतात. अयोध्येमध्ये मोठे कटआऊट नरेंद्र मोदी यांचे लावण्यात आले. त्यामध्ये बाल अवस्थेत श्रीराम नरेंद्र मोदी यांचा बोट धरून जाताय. ही श्रीरामाची बाल अवस्थेतील मूर्ती का? कारण सगळ्यात मोठे मोदी त्यांना दाखवयाचे आहे. मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार हे भासवायचे आहे. रामचंद्रमध्ये मोठे की नरेंद्र मोदी मोठे? नरेंद्र मोदी हे राम राम करत जनतेला मरा मरा करत आहेत, त्यामुळे तुम्ही सावध राहा, अशी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली.


आणखी वाचा 


India : झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूनं सर्वाधिक मतं