Uddhav Thackeray attacks on CM Eknath Shinde : कणकवली, सिंधुदुर्ग : मला मुख्यमंत्रिपदाला चिकटून राहायचं असतं तर बसू शकलो नसतो का? मला कळलं नव्हतं का माझे आमदार फुटत होते? त्यांना पकडून हॉटेलमध्ये टाकू शकलो नसतो का? या मिंद्याचं काय, उचलून त्याची दाढी खेचून कुठूनही आणलं असतं, असं म्हणत शिवसेना ठाकरे (Shiv Sena Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Kankavli) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर नाव न घेता टीका केली. उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर (Konkan ) आहेत. रविवारी त्यांची कणकवली इथं सभा झाली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. 


मला कळत नव्हतं का माझे आमदार फुटत आहेत. मला माहित होतं. मी माझे नासके आंबे फेकून दिले. मला या मिंद्याला दाढी ओढून आणता आलं नसतं का? या आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवून मुख्यमंत्रिपद वाचवालं असतं. पण मी स्वतः मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. आता आपल्याला कोकण किनारपट्टी भगवी करायची आहे. त्यासाठी आता तुमची साथ हवी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


भास्कर जाधव उद्धवमय झालेत (Uddhav Thackeray on Bhaskar Jadhav)


कोकणात एक वेगळं विश्व मला पाहायला मिळतंय. तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळ येऊन गेलं आणि नुकसान करून गेलं. आता या किनारपट्टीवर आपलं भगवं वादळ आलं आणि हे दिल्लीच्या दिशेने जातायत. भास्कर जाधव उद्धव उद्धव म्हणत होते यावरून कळतंय ते किती उद्धवमय झालेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणादरम्यान वैभव नाईक यांच्याबद्दल बोलताना तीन वेळेस  "वैभव"ऐवजी "उद्धव" असं नाव घेतलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.


मोदी कोकणात आले, पाणीबुडी प्रकल्प गुजरातला नेला (Uddhav Thackeray on PM Narendra Modi)


शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक झालो. पंतप्रधान आले होते सिंधुदुर्गमध्ये, पण ना किल्ल्यावर गेले ना शिवाजी महाराजांच्या मंदिरात. 
शिवाजी महाराजांचा पुतळा केला तेवढं चांगला केला. पंतप्रधान येथे आले आणि पाणीबुडी प्रकल्प गुजरातला नेला. आम्हाला वाटलं येथे येऊन काही महाराष्ट्र किनारपट्टीला देतील पण असं काही झालं नाही. गुजरात प्रेम गुजरातपुरतं ठेवा. गुजरातवरती संकट आलं होतं तेंव्हा तुम्ही कुठे होता? भूजमध्ये भूकंप झाला त्यावेळेस तुम्ही कुठे होतात माहित नाही, पण मी गेलो होतो मदत करायला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


नारायण राणेंवर हल्लाबोल (Uddhav Thackeray on Narayan Rane)


मी आज कोंबडी वडे खाल्ले. त्याच्याबद्दल काय बोलू. लोकसभामध्ये जर गटारगंगा समोर असेल तर त्याला काय करणार. पंतप्रधान म्हणाले होते मे दोन डजण गालिया खाता हू. जर पंतप्रधानांना लोक शिव्या देतात असं तुम्ही म्हणतात. तुमचे हे बिन भोकाचे टिनपाट काय आम्हाला रसगुल्ले रोज देतात का? ते सुद्धा मला शिव्या घालतात तुमचे भोक पडलेले तीनपट, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर केला. 


आता जर हे तीनपट माझ्याबद्दल बोलले तर तुम्ही त्याच भाषेत त्यांच्या पक्षातील वरपासून खालपर्यंत असलेल्या नेत्याला त्याच भाषेत बोला, असा आदेश उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.


राणेंना लाथ मारुन बाळासाहेबांनी हाकललं (Balasaheb Thackeray)


अटल बिहारी वाजपेयी यांना बाळासाहेब ठाकरे यांनी साथ दिली, नाहीतर त्यावेळी त्यांना कचाऱ्याच्या पेटीत फेकलं असतं. आता तुम्ही त्यांच्या मुलाला मला राजकारणतून संपवायला निघालात? हे श्रीराम म्हणताय, तुम्ही भाजपमुक्त श्रीराम म्हणा. त्या तीनपाटाला अजून भोक पाडा. 
बाळासाहेबांनी लाथ मारली याला , गेट आऊट म्हणाले, हा शिवसेना सोडून गेला नाही तर त्याला लाथ मारून काढला, असा हल्लाबोल ठाकरेंनी राणेंवर केला. 



भाजपमध्ये मर्दपणा राहिला असेल तर आव्हान आहे, गरघडी असलेले पोलीस, ईडी, सीबीआय बाजूला ठेवा आणि मैदानात या, मग बघू कोण कोणाच्या पाठीला माती लावतं, असं आव्हान ठाकरेंनी दिलं. 


गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? (Where is Devendra Fadnavis)


आमदार लोक गोळीबार करतात, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? मोदी म्हणतात घराणेशाही नको, मग हे टिनपाटाच्या घराणेशाहीचं काय? ही राणेची घराणेशाही तुम्हला मोदी चालणार का? घराणेशाही तुम्हाला चालणार का? रायगडला आहे, रत्नागिरीमध्ये आहे, कल्याणमध्ये आहे, नगरमध्ये घराणेशाही आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


दीपक केसरकरांवर हल्लाबोल (Uddhav Thackeray on Deepak Kesarkar)


खाली मुंडी पाताळ धुंडी असलेले तुमचे हे केसरकर मंत्री, खाली मुंडी ठेवून काय करतात माहित नाही. आपण इंग्रज्यांची मस्ती उतरवू शकतो
आपण विदेशी मस्ती संपवू शकतो, तर देशी मस्ती नाही उतरवू शकणार? 80 कोटी लोकांना तुम्ही अन्न देताय तर मग देशातील बेकारी हटलीय कुठे? 


आरएसएस आणि भाजपच्या काही लोकांना पोटतीडकीने बोलतो. मी तुम्हाला सांगतो ही दिशा हुकूमशाहीची आहे, ही मोडून काढायची आहे.
ज्याला खड्ड्यात पडायचं त्यांनी पडा. ज्यांना हुकूमशाही नको असेल तर या. 


ते म्हणतायत अबकी बार 400 पार, तुम्ही नारा द्या अब की बार भाजप तडीपार, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.  


Uddhav Thackeray speech Kankavali : उद्धव ठाकरे यांचं कणकवलीतील भाषण



संबंधित बातम्या 


Uddhav Thackeray : अब की बार भाजप तडीपार! मी पंतप्रधानांना नाही, पंतप्रधान मला शत्रू मानतात; राजापुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली