एक्स्प्लोर

Narayan Rane : नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने, 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा

Devendra Fadnavis On Narayan Rane : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या 74 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या राजकीय प्रवासावर आणि नेतृत्वावर भाष्य करत खास आठवणी शेअर केल्या.

सिंधुदुर्ग : नारायण राणे (Narayan Rane) म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस, त्यांच्या कामामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना मानणारा वर्ग तयार झाला, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाजपचे खासदार नारायण राणे यांचे कौतुक केलं. नारायण राणे यांच्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असल्याने त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाचा विचार सोडला नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा 74 वा वाढदिवस सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

Devendra Fadnavis Speech : राणेंकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नारायण राणेंसोबत काम करताना मिळालेल्या अनुभवांची आठवण सांगितली. मी सभागृहात पहिल्यांदा भाषण केलं, तेव्हा राणेंनी पाठवलेली ‘छान बोललास’ ही चिठ्ठी आजही आठवते, असे ते म्हणाले. त्यांनी पुढं सांगितलं की, नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यासोबत काम करणे ही मोठी संधी होती. दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.

Narayan Rane Assembly Impact : अर्थसंकल्पावर पकड आणि प्रभावी नेतृत्व

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणेंची अर्थसंकल्पावरची पकड विलक्षण होती. ते एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे बजेटवर बोलायचे. युती सरकारच्या काळात झालेल्या कामाची काँग्रेस सरकारने श्वेत पत्रिका काढल्यानंतर नारायण राणेंनी त्यावर ‘भगवी पत्रिका’ मांडत सरकारची जोरदार बाजू मांडली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.

Narayan Rane Political Legacy : राणेंचा दरारा आणि वारसा

विधानसभेत राणेंचा मोठा दरारा होता. त्यांच्या नेतृत्वामुळे विरोधी पक्षात असतानाही आम्ही सरकारवर तुटून पडायचो, असं फडणवीस म्हणाले. राणेंचा दिलदार स्वभाव आणि राज्यभर तयार झालेला जनाधार यावरही त्यांनी भाष्य केले. “राणे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस आहे. कोकणातील माणूस बाहेरून कठोर आणि आतून गोड असतो, असं पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे, ते राणेंना पाहूनच लिहिलं असावे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Family Support : कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

फडणवीस यांनी राणेंच्या कुटुंबीयांचाही उल्लेख केला. नीलम राणे यांचा त्यांना नेहमीच भक्कम पाठिंबा आहे. तसेच नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात त्यांचा राजकीय वारसा स्पष्टपणे दिसतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

राणेंनी कोकणाच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, “ते देश आणि राज्याचे नेते असले तरी त्यांच्या हृदयात कोकण आहे. राणेंना अजून खूप नेतृत्व करायचे आहे. त्यांचा 100वा वाढदिवसही आपण अशाच मोठ्या मैदानावर साजरा करू.”

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची सगळ्यांचीच इच्छा, जयंत पाटलांच्या मनात योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य 
आंबोलीमध्ये पेशानं डॉक्टर असणारा पर्यटक 400 फूट खोल दरीत कोसळला, मृतदेह बाहेर काढण्यात यश
आंबोलीमध्ये पेशानं डॉक्टर असणारा पर्यटक 400 फूट खोल दरीत कोसळला, मृतदेह बाहेर काढण्यात यश

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget