Shiv Jayanti 2024 wishes : ज्यांनी मराठा समाजाचा पाया रचला, त्या शिवाजी महाराजांचा आज जन्मोत्सव, म्हणजेच शिवजयंती (Shivjayanti). दरवर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते, यानिमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छापर संदेश पाठवतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही सुंदर आणि प्रेरक शुभेच्छा संदेश सुचवणार आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता. तुम्ही शिवजंयती निमित्त खालील शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि इतर सोशल मीडियावर देखील पोस्ट करू शकता किंवा स्टेटस म्हणून ठेवू शकता.
शिवजयंती शुभेच्छा संदेश (Shiv Jayanti Wishes)
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा!
जगणारे ते मावळे होते... जगवणारा तो महाराष्ट्र होता... पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
33 कोटी देवाच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला,
महाराष्ट्रावर भगवा फडकावणाऱ्या सिंव्हाला,
त्रिवार मनाचा मुजरा,
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकद तर प्रत्येकाच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती
जय भवानी! जय शिवाजी!
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे - राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
किती राजे आले आणि किती राजे गेले
पण तुमच्या सारखे कोणी नाही…
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
एक मराठा लाख मराठा
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
नाही जातीपातीत अडकला माझा दैवत होता उदार
अठरा बगड जाती हाताशी दिले मावला नाव शूर-वीर
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक होतं गाव, महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचं नाव
राजांना त्रिवार मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शिवरायांचे सैनिक आम्ही करू जीवाचे रान
मनात भगवा, ध्यानात भगवा, भगवा हिंदुस्थान!
जय शिवराय!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा: