Shivaji Maharaj Baby Names : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे. मराठी मातीत जन्मलेला प्रत्येक माणूस शिवरायांना खूप जास्त मानतो. शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) गाथा ऐकताच अभिमानाने प्रत्येकाची मान गर्वाने उंचावते. शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी आहे. एक पालक म्हणून प्रत्येक व्यक्तीला हेच वाटतं की, महाराजांची तत्वं, शिकवण मुलांनी कायम आचरणात आणली पाहिजे. लहान वयातच इतिहास विषयाच्या मार्फत आणि घरातील मंडळींकडून महाराजांच्या शूरपणाची गाथा सांगितली जाते.


...म्हणून महाराजांचं नाव शिवाजी ठेवलं


प्रत्येक पालकांना वाटतं की, आपलं मूल हे महाराजांसारखं व्हावं. त्या काळात जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितलं आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता, ते स्वभावाला नम्र, दयाळू आणि पराक्रमांनी साहसी, शूर होते. शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानणारे लोक शिवाजी महाराजांच्या नावावरुन त्यांच्या मुलांची नावं ठेवतात.


छत्रपती शिवाजी महाराजांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट आचरणात आणली तर त्या व्यक्तीचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालाही तुमचं मूल महाराजांसारखं नम्र, शूर व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेली नावं मुलांना ठेवू शकतात. या नावांवर एक नजर टाकूया. 


महाराजांच्या नावावरुन मुलींची नावं (Shivaji Maharaj Baby Girl Names)



  • हिंदवी

  • शिवश्री

  • शिवानी

  • शिवांजली

  • शिवांगी

  • शिवजा

  • शिवन्या

  • शिविका


महाराजांच्या नावावरुन मुलांची नावं (Shivaji Maharaj Baby Boy Names)



  • शिवाजी

  • स्वराज 

  • शिवांश

  • शिवबा

  • शिवांक 

  • शिवेंद्र 

  • शिवम 

  • शिवतेज 

  • शिवशंकर 

  • शिवानंद

  • शिवजित 

  • शिवराज

  • शिवाक्ष

  • शिवशंभू

  • शिवार्थ

  • शिवंकर


शिवजयंतीचा इतिहास (Shiv Jayanti History)


वैभव, शौर्य, दया आणि औदार्य यांचं प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 1870 पासून साजरी करण्यास सुरुवात झाली. सर्वात आधी पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा केला. पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी आपल्या लाडक्या राजाची समाधी शोधून काढली. नंतर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.


लोकमान्य टिळक त्या काळात जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटीविरुध्द लढा देत होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जावी, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती आणि शौर्य देशातील तरुणांना आणि जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो, यासाठी दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. परंतु, आता शिवजयंती फक्त देशातच नव्हे, तर विदेशातही साजरी केली जाते.


हेही वाचा:


Shiv Jayanti 2024 : आज शिवाजी महाराजांची 394 वी जयंती! वेळ, महत्त्व आणि राजांचा इतिहास जाणून घ्या