Scorpio Horoscope Today 10th March 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांच्या तब्येतीत चढ-उतार कायम राहतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Scorpio Horoscope Today 10th March 2023 : व्यवसायात अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा एकाच ठिकाणी गुंतवणूक करा.
Scorpio Horoscope Today 10th March 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार जाणवतील. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षणात यश मिळेल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्धही प्रवासाला जावे लागेल, जिथे तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करावे लागेल.
राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा सल्ला घ्या
आज घरात मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जातील. व्यवसायात अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा एकाच ठिकाणी गुंतवणूक करा. स्वत:च्या जबाबदारीवर कामाचं नियोजन करा. आर्थिक बाबतीत देवाण-घेवाण जपून करा. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा सल्ला घ्या. व्यवसायात नवीन घडामोडींचा विचार करताना आपली आवक लक्षात घ्या. त्यानंतरच नवीन घडामोडींचा विचार करा.
आरोग्याची विशेष काळजी घ्या
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता असेल तर तुम्ही तुमची समस्या तुमच्या जवळच्या मित्राकडे व्यक्त करु शकता. यामुळे तुमचं दु:ख थोडं हलकं होईल. तसेच, समस्यांवर मार्ग निघेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
आजचे वृश्चिक राशीचे आरोग्य
वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहिल. पण, जास्त धावपळ केल्याने शारीरिक थकवा जाणवू शकतो. कामाच्या दरम्यान विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा. ध्यान आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.
वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय
हिरवा मूग गरजूंना दान करा.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :