Satara Crime: सुमारे एक महिन्यांपूर्वी एका गावातून दुसऱ्या गावात आलेल्या जमावाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल शिवाजी पवार (वय 28, रा. पांगारे, ता. सातारा, जि. सातारा) याचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. यानंतर पांगारे गावच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मृतदेहासह रुग्णवाहिका सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात नेली आणि राजापुरी गावातील मारहाण करून फरार झालेल्यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. युवतीची छेड काढल्यानंतर विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर महिनाभरापूर्वी वाद उफाळून आला होता. या वादात राहुलचा बळी गेला आहे. 


तरुणाच्या खून प्रकरणात सातारा तालुका पोलिसांकडून 16 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यामधील दोन मुले अल्पवयीन आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी करत नातेवाईकांनी राहुलचा मृतदेह एसपी ऑफिसला आणला होता. संतप्त झालेल्या ग्रामस्थांना पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर राहुलच्या मृतदेहावर रात्री पांगारे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी दिरंगाई केल्यास गावकऱ्यांनी  पुन्हा रस्त्यावर येणार असल्याचा इशारा दिला. 


प्रकरण नेमकं काय?


सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील पांगारे गाव आहे. या गावातील मुलं, मुली शेजारी असलेल्या राजापुरी गावात शाळेला जातात. पांगारे गावातील मुलीची राजापुरी गावातील एका युवकाने युवतीची छेड काढली होती. यानंतर  याचा जाब मयत राहुल पवार आणि त्याच्या भावाने विचारला होता. याचाच राग मनात धरून राजापुरीमधील 25 ते 30 युवक साधारण महिन्यापूर्वी पहाटेच्या सुमारास राहुलच्या घरी आले आणि राहुलला घरातून बाहेर बोलावून बेदम मारहाण केली. यावेळी मारहाण झालेल्या राहुलला वरून कोणतीही मारहाण दिसत नव्हती. मात्र, अमानुषपणे केलेल्या मारहाणीमध्ये आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे राहुल उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले. एक महिन्यापासून राहुलवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


पोलिसांनी  काय कारवाई केली?


दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी 15 नावांसह इतर 25 ते 30 जणांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. जखमी राहुलची प्रकृती बिघडत गेल्यावर आरोपींवर 307 चे कलम वाढवण्यात आले. आता राहुलचा मृत्यू झाल्याने आरोपींवर 302 कलम दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन संशयित हे अल्पवयीन आहेत. दुसरीकडे, राहुलला गावात येऊन बेदम मारहाण झाल्यानंतर राजापुरी गावातील ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलच्या घरी येत माफी मागून चूक मान्य केली होती. तसेच आरोपींच्या नावाची यादी तटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटलांना दिली होती. तसेच इतर 15 नावे आम्ही नंतर सांगू असेही सांगितले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या