Koyna Dam: कोयना धरणात गेल्या 24 तासात एक टीएमसीने वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2023 05:37 PM (IST)
1
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोमवारी सकाळपर्यंत 24 तासामध्ये नवजामध्ये सर्वाधिक 133 मिलीमीटरची नोंद झाली.
3
त्याचबरोबर गेल्या 24 तासांत कोयना धरणात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
4
तसेच प्रमुख धरणातही पाण्याची आवक वाढत आहे.
5
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे.
6
शनिवारपासून पश्चिम भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.
7
सोमवारी सकाळपर्यंत 24 तासांत कोयनानगर येथे 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
8
कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजासह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात चांगला पाऊस झाला आहे.
9
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला 1072 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
10
महाबळेश्वरला 1517 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.