Eknath Shinde : बंडाचे निशाण फडकावून शिवसेना महाविकास आघाडी सरकारला तगडा झटका देऊन गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हाॅटेलमध्ये ठाण मांडून बसलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार झटका बसला आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी असलेल्या बंगल्याला असलेला बंदोबस्त पोलिसांनी काढला आहे. पेट्रोलिंग करत बंगल्यावर पोलिसांची नजर असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. दरम्यान, गावातील घराचा बंदोबस्त हटवण्यात आल्यानतंर राजकारण सुरू झाल्याची चर्चा गावामध्ये सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव आहे. या ठिकाणी त्यांचे नेहमी येणे-जाणे असते. 


शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ला चढवला जात आहे. अनेक ठिकाणी बॅनरही फाडून टाकले आहेत. बॅनरना काळंही फासलं जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने बंडखोर आमदारांनी चांगलीच धास्ती घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. 


15 आमदारांच्या निवासस्थानी सीआरपीएफचे जवान


त्यामुळे धास्तावलेल्या आमदारांनी केंद्राकडे सुरक्षेची मागणी केली होती. दरम्यान, मिळालेल्या आतापर्यंत 15 आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे सीआरपीएफचे जवान यांच्या निवासस्थानी तैनात असतील. दरम्यान, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळपर्यंत 15 आमदारांच्या निवासस्थानी सीआरपीएफचे जवान तैनात होतील. अनेक बंडखोर आमदारांनी आपल्या कुटुंबीयांना भीती वाटत असल्याचे म्हटले आहे.


दुसरीकडे केंद्राकडून सुरक्षा मिळाल्यानंतर या सर्व प्रकरणात भाजपचा सहभाग स्पष्ट होत असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, काल एकनात शिंदे यांनी काल सूडभावनेतून आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आरोप फेटाळून लावत कुठल्याही आमदाराची सुरक्षा काढून घेण्यात आलं नसल्याचं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे हे चुकीची माहिती पसरवत असल्याचा दावाही गृहखात्याकडून करण्यात आला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या