निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतून तुमची नावं डिलिट करणार, शिंदेंच्या आमदाराचा विरोधकांना दम
Mahesh Shinde : जे लोक या निवडणुकीत पुढे पुढे करतात त्यांची नावं काढा, त्यांचा डिसेंबरमध्ये कार्यक्रम करू असा दम शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी दिला.

सातारा : एकीकडे सरकार मोठं शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असताना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजेनवरुन बोलताना त्यांनी मतदारसंघातल्या विरोधकांना थेट दमच दिला. निवडणुकीनंतर स्क्रूटिनी कमिटीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून तुमची नावं डिलीट करण्यात येतील असं वादग्रस्त वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी केलं.
निवडणुकीनंतर अर्ज बाद करणार
महेश शिंदे हे एका सभेमध्ये बोलताना म्हणाले की, एका व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर पडलं होतं की मुख्यमंत्रीसाहेब, तुमची लाडकी योजनेचे 1500 रुपये आम्हाला नकोत. आम्हाला आरक्षण द्या. त्यावर मी त्याला फोन करून विचारलं की, तुला आरक्षण दिलं आहे. अजून काय पाहिजे? तुझ्या घरच्यांनी अर्ज केलंय का? त्यावर तो बोलला की अर्ज केलाय. त्यानंतर मी म्हणालो, तो अर्ज मी बाद करतो. निवडणूक झाल्यानंतर स्क्रुटिनी होईल आणि कोण पात्र आणि कोण अपात्र हे ठरेल.
महेश शिंदे पुढे म्हणाले की, तुमच्या आमदाराला तुम्ही ओळखतात. गावागावातील कोपऱ्या-कोपऱ्यात कोण राहतंय हे माहिती आहे. या इलेक्शनमध्ये पुढे पुढे करणाऱ्यांची नावं काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करणार.
जयंत पाटलांची टीका
महेश शिंदेंच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी टीका केली. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं ही योजना आणल्याचं जयंत पाटील म्हणाले. नंतर 10 लाखांचे अर्ज लाखावर आणण्याचा यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
ही बातमी वाचा:
Before You Go
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट






















