Sangli Crime News : एका धक्कादायक घटनेनं सांगली (Sangli News) शहर पुरतं हादरलं आहे. सांगलीतील संजयनगर, झेंडा चौक परिसरातील तरुणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून त्याची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. नितीन आनंदराव शिंदे (वय 32, रा. संजयनगर, सांगली) असं मृत तरुणाचं नाव आहे. या हत्याप्रकरणात चार जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
सांगली शहरातील संजयनगर, झेंडा चौक परिसरातील तरुणाच्या डोक्यात गॅस स्टोव्ह घालून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आला आहे. नितीन आनंदराव शिंदे (वय 32, रा. संजयनगर, सांगली) असं मृत तरुणाचं नाव आहे. या खुनात चौघांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. किरकोळ वादातूनही हा खून चौघांनी केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
नितीन शिंदे संजयनगर येथील खेराडकर पेट्रोलपंपाजवळील झेंडा चौकात राहत होता. त्याची मालवाहतूक गाडी असून तो हाच व्यवसाय करायचा. नितीनच्या वडिलांची वखार आहे. नितीन कामवरून परतल्यानंतर काल (रविवारी) सांयकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी एका परप्रांतीयाच्या घराजवळ तो आला होता. त्या चौकात संशयित आले. त्याच्या किरकोळ कारणातून वादावादी झाली. त्यानंतर अर्ध्या तासानं नितीन हा घरात गेला. त्यावेळी संशयित पुन्हा दुचाकीवरून आले. त्यानंतर पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी तेथील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्यानं नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर मात्र हल्लेखोर तिथून पसार झाले. नितीन तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
अतिरक्तस्त्राव झाल्यानं नितीनचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या किरकोळ कारणातून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र, हत्या करण्यामागील ठोस कारण अद्याप समजू शकलेलं नाही. खूनाची माहिती समजताच पोलीस उपाधिक्षक अण्णासाहेब जाधव, निरिक्षक सुरज बिजली, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, कपिल साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांनी तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळी पंचनामा करून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. घरासमोर हाकेच्या अंतरावर नितीनची हत्या झाली, मात्र कोणाला कळालंच नाही. नितीन हल्ला झाल्यानंतर बराचकाळ तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. दरम्यान, नितीन शिंदे याचा खून त्याच्या राहत्या घरापासून अवघ्या दोनशे फुटाच्या अंतरावर झाला आहे. पण हा खून कोणत्या कारणातून झाला? हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.