सांगली : सांगलीत (Sangli Crime) कृष्णा नदीमध्ये एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आर्यन जितेंद्र माने (वय 18, रा. विश्रामबाग, सांगली) असे त्याचे नाव आहे. आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, हे मात्र समजू शकलेलं नाही. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


आर्यन माने हा विश्रामबाग परिसरातील गर्व्हेमेंट कॉलनीमध्ये वास्तव्यास होता. तो रविवारी (4 फेब्रुवारी)दुपारी क्लासला जातो, असे सांगून तो घरातून निघून गेला. परंतु सायंकाळी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, आर्यन मानेचा शोध सुरू असताना तो कृष्णा नदीवरील बंधार्‍याजवळ मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. परंतु त्याने आत्महत्या कोणत्या कारणातून हे मात्र समजू शकले नाही. 


दरम्यान, पुण्यामध्ये चुलती आणि पुतण्यानं एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे शिरुर तालुक्यात खळबळ माजली आहे. शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे चुलती आणि पुतण्याने एकाच वेळी आत्महत्या केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कल्पना रवींद्र शिंदे (31 वय) आणि सचिन दौलत शिंदे (वय 24) असे आत्महत्या करणाऱ्या चुलती आणि पुतण्याची नावे आहेत. कल्पना आणि सचिन या चुलती-पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्यानं गणेगावात खळबळ माजली आहे.  गावात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. याप्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे आणि गोविंद ज्ञानदेव शिंदे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती 


इतर महत्वाच्या बातम्या