Jayant Patil : पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो म्हणजे बिहारशी (bihar) आपण स्पर्धा करत नसून बिहारला महाराष्ट्रनं गुन्हेगारीत मागे टाकल्याचे वक्तव्य राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनी केलं. महाराष्ट्रचा बिहार झालाय का? असा सवाल त्यांना प्रसारमाध्यमांनी केली होता. त्यावेळ ते बोलत होते. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या मुद्यावरुन जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.


 आरक्षणाच्या  बाबतीत हे सरकार पूर्ण अपयशी


दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. आरक्षणाच्या  बाबतीत हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. सर्व समाजाला आरक्षणावरून खेळवले जातेय. आपला खेळण्यासारखा वापर होतोय आणि त्यामुळं दोन्ही समाजात अस्वस्थता आहे.मराठा,ओबीसी समाज अस्वस्थ असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


मंत्रिमंडळमधील मंत्र्यालाच पेकाटात लाथ घालायची भाषा होतेय हे दुर्दैव


सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने छगन भुजबळ यांच्या पेकाटात लाथ घालून त्यांना घालवले पाहिजे अशा पध्दतीची भाषा वापरली आहे. सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुंख्यमंत्र्यांनी यांनी त्या आमदाराला  वास्तविक समज अथवा काढून टाकले पाहिजे होते. पण मंत्रिमंडळमधील मंत्र्यालाच पेकाटात लाथ घालायची भाषा करत असतील तर हे दुर्दैव असल्याचे जयंत पाटील म्हणाले. पण याकडं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष देत नाहीत. त्यामुळं ओबीसींच्या प्रश्नांकडं बघण्याचा सरकारचा दृष्टीकोन काय आहे हे लक्षात येते असे जयंत पाटील म्हणाले.


मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असून देखील कायदा आणि सुव्यवस्था नाही


पोलीस स्टेशनमध्ये ज्या आमदाराने गोळीबार केला, त्यावर ते आमदार मुख्यमंत्री यांच्याशी त्यांचा असलेला व्यवहारावर स्पष्टपणे बोलतोय. या राज्यात काय चालले ते लोकांना आता कळत आहे. त्यामुळं राजकारणाचे गुन्हेगारीकरण की गुन्हेगारीकरणाचे राजकारण  झालेय अशी शंका वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असून देखील कायदा आणि सुव्यवस्था राज्यात नाही. मंत्रीमंडळातील मंत्र्यांना देखील सुरक्षित  वाटत नाही. दुसरीकडे यांचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात, त्यामुळे यांच्या  आमदारांची दहशत वाढली आहे. महाराष्ट्रची घडी बिघडवणारे हे चित्र सत्ताधारी लोकांनी निर्माण केल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Kalyan Crime News : भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; उल्हासनगरमध्ये खळबळ, पोलीस ठाण्यातील घटना