एक्स्प्लोर

Jayant Patil : शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा, पण उद्धव ठाकरे कोणाकडे याला जास्त महत्त्व! जयंत पाटलांचा स्पष्ट निर्वाळा

Jayant Patil : खरी शिवसेना कुणाकडे याकडे खरे शिवसैनिक वाट पाहत असले, तरी उद्धव ठाकरे कुणाकडे हे महत्वाचे आहे. खरे शिवसैनिक उद्धव यांच्या मागे थांबतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Jayant Patil : शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात येत असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हा तांत्रिक मुद्दा असल्याचे म्हटले आहे. खरी शिवसेना कुणाकडे याकडे खरे शिवसैनिक वाट पाहत असले, तरी उद्धव ठाकरे कुणाकडे हे महत्वाचे आहे. खरे शिवसैनिक उद्धव यांच्या मागे थांबतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते बाळासाहेबांची परंपरा चालवत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, आज झालेल्या अवघ्या 10 मिनिटांच्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा तारीख देण्यात आली असून आता सुनावणी 20 दिवसांनी पुढे ढकलली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी भाष्य केले. महाराष्ट्रतील सत्तासंघर्षावर कोर्टाने आणखी 2 महिने वेळ घेतला, तर तो वेळकाढूपणा ठरेल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.  

पण बारामती शरद पवारांना सोडणार नाही

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बारामती दौरा आणि बारामती लोकसभेच्या निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यावर आणि भाजपच्या अजेंड्यावर जयंत पाटील यांनी टीका केली. बावनकुळेंना भाजपने  विधानसभा तिकीट नाकारले होते, त्याची चर्चा आम्हाला करायचची नाही. बावनकुळेंना शरद पवारांवर बोलणे शोभत नाही. एकवेळ सूर्य पश्चिमकडे उगवेल, पण बारामती शरद पवाराना सोडणार नाही, एवढे घट्ट नाते पवारांचे बारामतीशी आहे असल्याचे ते म्हणाले.  

एखाद्याचा अश्वमेध रोखल्याचा जो त्रास होतो तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपला होतो. बारामतीची जनता आम्हाला चांगली माहिती आहे; कुणीही आलं, तरी सुप्रिया सुळे यांना 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळते आणि अजित दादांनाही 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळते. सगळ्यात मोठ्या नेत्याला आम्ही आव्हान देतो हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे बारामतीचे उदाहरण आहे. आमच्याही पक्षाचा प्लॅन मी लवकरच मांडेन,  त्यावेळी आम्ही कुणाकुणाला टार्गेट करतोय ते लवकरच तुम्हाला कळेल. 

भाजप आज सगळीकडे सत्तेत आहे, लोकांची कामे करायचे सोडून अशा पध्दतीने आव्हान देण्याचं काम भाजपकडून केले जातेय याचा अर्थ भाजपची लोकप्रियता कमी होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget