एक्स्प्लोर

तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक

आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटखिंडी येथील गाताडे मळा परिसरात पांडुरंग गोविंद कोकाटे (वय 70) यांचा जनावरांचा गोठा आहे.

सांगली : सुनेचा विनयभंग केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या 70 वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्याच्या (Sangli) वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे परप्रांतीय शेतमजूराने काठीने बेदम मारहाण करुन हा खून केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले. या संतापजनक घटनेमुळे गोटखिंडी परिसरात खळबळ उडाली असून आष्टा पोलिसांनी (Police) संशयित परप्रांतीय शेतमजूर राजू याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू आहे. 

आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटखिंडी येथील गाताडे मळा परिसरात पांडुरंग गोविंद कोकाटे (वय 70) यांचा जनावरांचा गोठा आहे. कोकाटे यांची सून गोठ्यात शेण काढत असताना शेजारच्या शेतात काम करणारा परप्रांतीय शेतमजूर राजू तिच्याकडे गेला. त्याने तिचा हात धरून, "तू उसात चल," असे म्हणत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ही घटना सुनेने पांडुरंग कोकाटे यांना सांगितल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना बोलावून घेतले. त्यावेळी संशयित राजू याने कोकाटे यांच्यावर काठीने हात, पाय, डोके व शरीरावर बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या छातीवर बसूनही मारहाण केली. शेतातील आरडाओरड ऐकून मंगल कोकाटे, कमल कोकाटे व सचिन कोकाटे घटनास्थळी धावून आले. जखमी कोकाटे यांनी कुटुंबीयांना "राजूनेच मारहाण केली," असे सांगितले. त्यानंतर त्यांना तातडीने आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन भंडारे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर संशयित राजू डोंगराच्या दिशेने पळून जात असताना ग्रामस्थ व कोकाटे कुटुंबीयांनी त्याचा पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, ईश्वरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, आष्टा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, सत्यजित आवटे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंगल पांडुरंग कोकाटे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात संशयित राजूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Advertisement

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget