Vishnudas Bhave Gauravpadak Award : यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदक पुरस्काराचे स्वरुप आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून जेष्ठ दिग्दर्शक, रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होणार आहे.


विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्याना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा दिले जाणारे हे 55 वे गौरव पदक आहे. आतापर्यंत 54 वर्षांपासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा मानला जाणार पुरस्कार वितरित केला जातो.


नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरवपदक देऊन सन्मानित करणेत येते. यंदा वर्षी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक, अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले व करीत असलेले सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर करण्यात आला. जेष्ठ दिग्दर्शक, रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांचे शुभहस्ते विष्णुदास भावे गौरवपदक 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने सतीशजी आळेकर यांना प्रदान करणेत येणार आहे.


कोण आहेत सतीश आळेकर?



  • जन्म : 1949 

  • नाटककार, दिग्दर्शक, नट, पटकथा लेखक शिक्षण: एम. एस्सी. (जीवरसायनशास्त्र) पुणे विद्यापीठ 1972


परिचय



  • थिएटर अकादमी, पुणे (1973) या संस्थेचे संस्थापक सदस्य, संस्थेचे 1973 ते 1992 या काळात व्यवस्थापन.

  • 1972 ते 1996 बी.जे. मेडीकल कॉलेज, पुणे येथे संशोधन अधिकारी

  • 1996 ते 2009 मधे पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक

  • सप्टेंबर 2013 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ख्यातनाम प्राध्यापक म्हणून नियुक्ती.

  • फोर्ड फौडेशन, दिल्ली, भारत भवन, भोपाळ, राष्ट्रीय नाट्य विदयालय, दिल्ली, विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली, गोवा कला अकादमी, पणजी आदि संस्थांशी सल्लगार नात्याने वेळोवेळी संबंधित.


नाट्यलेखन



  • मिकी आणि मेमसाहेब (1973), महानिर्वाण (1974), महापूर (1945), बेगम ब (1979), शनवार-रविवार (1982), दुसरा सामना (1989), अतिरेकी (1090), पिढीजात (2003), एक दिवस मठाकडे (2011), ठकीशी संवाद (2021)


एकांकिका 



  • 1) झूलता पूल व इतर एकांकिका (झूलता पूल, मेमरी, भजन, सामना) 1973, 2) भिंत, वळण (1982) 3) दार कोणी उघडत नाही, बसस्टॉप (1985) 3) आधारित एकांकिका (2011) चित्रपट लेखन: जैत रे जैत (पटकथा संवाद) 1977, कथा दोन गणपतरावांची (संवाद) 1997 टेलेव्हिजन मालिका देखो मगर प्यारसे (हिंदी, 13 भाग) दिग्दर्शन 1985 (दूरदर्शन दिल्ली करिता)


लघुपट दिग्दर्शन 



  • हमाल पंचायत (1979)


नाट्य-दिग्दर्शन



  • मिकी आणि मेमसाहेब (1973), महानिर्वाण (1974), बेगम (1979), शनवार-रविवार (1982), अतिरेकी (1990)


अभिनय (नाटक) 



  • महानिर्वाण, बेगम बर्वे, शनवार रविवार


अभिनय (मराठी चित्रपट) 



  • यशवंतराव चव्हाण-  बखर एका वादळाची, आक्रित, उंबरठा, एक होता विदुषक, देवी अहिल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कथा दोन गणपतरावांची, सखी माझी, चिंटू, चिंटू -2, होवून जाऊ द्या - वूई आर ऑन, आजचा दिवस माझा, म्हैस, हाय-वे, राजवाडे एन्ड सन्स, मि शिवाजी पार्क व्हेनटीलेटर, स्माईल प्लीज, भाई व्यक्ती की वल्ली


मालिका 



  • पिंपळपान, नूपुर इत्यादी


अभिनय (हिंदी चित्रपट)



  •  ये कहानी नहीं, अय्या, देख तमाशा देख, 82


इतर महत्वाच्या बातम्या