Glammon Mrs India : थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये सांगली सीआयडीच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला या ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या ठरल्या आहेत. याशिवाय आरिफा मुल्ला या त्या स्पर्धेतील बेस्ट पर्सनॅलिटीच्या उपविजेत्याही ठरल्या. यामुळे पोलीस उपअधीक्षक असलेल्या अरिफा मुल्ला यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
थायलंडमधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण 42 स्पर्धकांची फुकेट येथील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत सांगली सीआयडी विभागाच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला या थायलंड येथे झालेल्या "ग्लॅमन मिसेस इंडिया" ठरल्या. मुल्ला यांनी या स्पर्धेची ऑडिशन पुणे येथे दिली होती. फिल्मफेअर मिडल इस्ट च्या ग्लॅमन या कंपनीकडून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
पल्लवी जाधवही या पुरस्काराच्या मानकरी
अभिनेत्री आणि मॉडेल अशी ओळख असलेल्या पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधवही 'ग्लॅमन मिसेस इंडिया' पुरस्काराच्या विजेत्या ठरल्या आहेत. त्या अलीकडेच विवाहबंधनात अडकल्या. पल्लवी जाधव यांनी अनेक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत. आणि मुलींनी आत्मविश्वासाने जगावं यासाठी त्या सातत्याने प्रोत्साहन देत असतात. 2021 मध्ये पल्लवी जाधव यांनी जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला होता.
पीएसआय पल्लवी जाधव यांची सोशल मीडियातही मोठी क्रेझ आहे. पोलिसांमध्येही त्यांची ओळख एक डॅशिंग महिला अधिकारी म्हणून आहे. पल्लवी जाधव औरंगाबादच्या असून जालना पोलिसांमध्ये दामिनी पथकाचे त्या नेतृत्व करतात.
इतर महत्वाच्या बातम्या
- Sangli News : मुलांच्या अभ्यासासाठी घरातील टीव्ही, मोबाईल फोन रात्री सात ते साडेआठ बंद, मोहित्यांचे वडगाव गावातला उपक्रम
- Sangli News : सांगली जिल्ह्यातील गुरुजी, मुख्याध्यापकांनीच बँकेचे 25 कोटींचे कर्ज थकवले! वसुलीसाठी नोटीसा