Sangli Crime : सांगली जिल्ह्यात दोन नर जातीच्या बिबट्यांचा (leopard) मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वाळवा तालुक्यातील कार्वे आणि इटकरे या दोन गावात बिबट्यांचा मृत्यू झाला. यामध्ये एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असून दुसऱ्या बिबटयाच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकाच वेळी दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने वन्य प्राण्यांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (leopard)
वाळवा तालुक्यातील इटकरेमदील रवींद्र रघुनाथ पाटील यांच्या शेतात सडलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह आढळून आला. पाच ते सहा दिवसांपूर्वी या बिबट्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या घटनेत बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे वाळवा तालुक्यातीलच कार्वे येथील हणमंत महादेव माळी यांच्या शेतातील विहिरीत अंदाजे सहा महिने वयाचा बिबट्या पडला. विहिरीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. दत्त टेकडी परिसरातील कार्यालयात या बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये पाण्यात बुडून या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दुचाकीने निघालेल्या युवकावर झेप टाकून बिबट्याचा हल्ला
दरम्यान, यापूर्वी दुचाकीवरून निघालेल्या युवकावर बिबट्याने (leopard attacked on young man in walwa) वाळवा तालुक्यातील तांबवे शिवारात 10 डिसेंबर रोजी सायंकाळी घडला होता. युवक बहेपूल ते तांबवे दंडभाग रस्त्याने जात असताना बिबट्याने दुचाकीवर झेप टाकून हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने दुचाकीचा पाठलागही केला. गेल्या काही महिन्यांपूर्वी नेर्ले-कापुसखेड रस्त्यावर असा प्रकार घडला होता. तांबवे येथील रोहित जाधव हा दुचाकीवरून कामानिमित्त बहे येथे गेला होता. रोहित सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बहे-तांबवेच्या दंडभाग रस्त्यावरून घरी जात होता. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला चरी पलीकडील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर झेप मारली.
बिबट्यानेअचानक (leopard) केलेल्या हल्ल्याने रोहित घाबरला. त्याने दुचाकीचा वेग वाढवला बिबट्याने 60 ते 70 मीटरपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला. गेल्या काही दिवसांपासून दंडभाग परिसरात बिबट्याचा वावर आहे. काही महिन्यांपूर्वी नेर्ले- कापुसखेड रस्त्यावर दुचाकी वरून निघालेल्या तरुणाचा बिबट्याने पाठलाग केला होता. नेर्ले, पेठ, काळमवाडी, हुबलवाडी, कापुसखेड, तांबवे शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शिवारात नेमके किती बिबटे आहेत याबद्दल वनविभागाही अनभिज्ञ आहे.
इतर महत्वाच्या बातम्या