Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील अपहरण झालेल्या शासकीय कंत्राटदार माणिकराव पाटील यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांचे अपहरण करून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कवठेपिरान हद्दीतील वारणा नदी पात्रात हात बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांचे अपहरण करून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खून करण्यामागचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. 


माणिकराव यांचा मुलगा विक्रमसिंह यांनी सांगली ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची झाल्याची तक्रार दिली होती. 13 ऑगस्ट रोजी तुंग येथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते.  पाटील 13 ऑगस्ट रोजी रात्री ते तुंग येथे त्यांच्या मोटारीतून गेले होते. रात्री साडेआठ ते पाऊणेनऊच्या सुमारास गाडीसह अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले होते. बराच वेळ ते न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता ते कोठेही आढळून आले नाहीत.


त्यामुळे मुलगा विक्रमसिंह पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली होती.  पोलिसांनी सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात एका ठिकाणाहून आलिशान मोटार जाताना दिसली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला  होता. कुटूबीयांनी माणिकराव यांचा कोणाशीही वाद नव्हता किंवा त्यांना इतर अडचणी नसल्याचे सांगितल्याने अपहरण कुणी आणि कशासाठी केलेय याचा कुटुंबाला देखील अंदाज आलेला नाही.  


पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर सुरुवातीला माणिकराव यांची जयसिंगपूरजवळ सीसीटिव्हीमध्ये मोटार दिसून आली होती. त्यानंतर पुढे कोंडीग्रेजवळ त्यांची मोटार बेवारस स्थितीत आढळली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या