एक्स्प्लोर

Anil Babar : नशिबात असेल तर मंत्रिपद मिळेल, आमदार अनिल बाबर यांचं सूचक वक्तव्य

शिवसैनिकांमध्ये आणि आमच्यामध्ये जे काय मतभेद तयार झालेत त्यावर देखील मार्ग निघेल असे वक्तव्य आमदार अनिल बाबर यांनी केलं. तसेच सांगली जिल्ह्याच्या नशिबात असेल तर मंत्रीपदही मिळेल असेही ते म्हणाले.

Anil Babar : शिवसेनेचेच सरकार असावं हे शिवसैनिकांची भावना होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी देखील शिवसेनेचे सरकार ठेवून शिवसैनिकांची भावना जपली. आता शिवसैनिकांमध्ये आणि आमच्यामध्ये जे काय मतभेद तयार झालेत त्यावर देखील कालांतराने मार्ग निघेल असे वक्तव्य खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांनी केलं आहे. नाराज शिवसैनिक पुन्हा आमच्यासोबत येतील असा विश्वास अनिल बाबर यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या नशिबात मंत्रिपद असेल तर मिळून जाईल, असे म्हणत बाबर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. 

अडीच वर्षात काळात विकास खुंटला होता
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे मतदारसंघात परतले आहेत.  त्यांनी आल्यानंतर लगेच मतदारसंघातील लोकांच्या भेटी घेण्याबरोबरच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन मतदारसंघातील काही प्रश्नांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे सरकार लोकाभिमुख आहे. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात विकास खुंटला होता. पण आता शिंदे सरकारच्या काळात राज्याला पुढे नेण्याचा आणि राज्य विकासाच्या वाटेवर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही अनिल बाबर यांनी सांगतिले. 

नशिबात असेल तर मंत्रिपद मिळून जाईल

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्याने आता जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांना मंत्रीपदाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले अनिल बाबर यांना देखील मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांना देखील मंत्रिपदाची आशा आहे. अनिल बाबर यांना यावेळी मंत्रिपद मिळणार का? हा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, या गोष्टी ठरवणं आपल्या हातात नाही, मात्र जिल्ह्याच्या नशिबात मंत्रिपद असेल तर  मिळून जाईल प्रतिक्रिया अशी बाबर यांनी दिली. 


संवेदनशील काळातही अनिल बाबर यांनी सुरक्षा नाकारली

राज्यात गेल्या पंधरा दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.  त्यानंतर केंद्र व राज्य सरकार या दोघांकडून आमदारांना सुरक्षा देण्याचा निर्णय झाला. परंतू आमदार अनिल बाबर आणि त्यांच्या कटुंबियांनी सर्व प्रकारे मिळणारी सुरक्षा नाकारली. या संवेदनशील काळातही सुरक्षा नाकारणारे ते एकमेव आमदार आहेत. आमदार अनिल बाबर यांनी आपल्याबरोबर शस्त्रधारी पोलीस सुरक्षारक्षक ठेवला नाही. परंतू गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून राजकारण अत्यंत संवेदनशील बनले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांच्या कार्यालयावर व घरांवर हल्ले झाले होते. काही अनुचित घटना घडल्यानंतर केंद्राने प्रत्येक आमदाराला वाय दर्जाची सुरक्षा देणार असल्याचे सांगितले. सुप्रिम कोर्टासह राज्यपाल यांनीही राज्य सरकारला आमदारांना सुरक्षा देण्याविषयी सूचना केल्या होत्या. परंतू, आमदार बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांनाही सुरक्षा नाकारली. आमदार बाबर यांच्या विटा येथील निवासस्थानी व कार्यालयाजवळ गेल्या पंधरा दिवसात देण्यात आलेली सुरक्षा ठेवू नये, अशी भूमिका आमदार बाबर यांनी घेतली आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Jejuri Warkari Accident: जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं प्रकरण काय?
सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget