सांगली: सांगली जिल्ह्यातील जत मार्गावर क्रुझर आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर झाली आहे. या अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर 14 ते 15 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दुर्घटनेतील (Major Accident) मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विजयपूर-गुहागर महामार्गावर (Vijaypur Guhagar Highway) सांगली जिल्ह्यातील जतवरुन येणाऱ्या जत-मुंबई लक्झरी बसला क्रुझर जीपने धडक दिली. या जीपमधून लग्नाचे वऱ्हाड प्रवास करत होते. या जीपमध्ये 14 ते 15 जण होते. त्यामुळे ही जीप खच्चून भरली होती. जत मार्गावरुन जात असताना चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि ही जीप लक्झरी बसला (Luxury Bus) जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, क्रुझर जीपच्या (Cruiser Jeep) पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे चालकासहित पुढच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित लोक गंभीररित्या जखमी झाले. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. क्रुझरमधील सर्वजण सावर्डेकडे लग्नसमारंभावरुन परतत होते. त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कवठेमहांकाळ आणि जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तिघांची जखमींची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी झालेल्यांवर ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलला हलवले.
फराळाचे साहित्य रस्त्यावर
ही दुर्घटना इतकी भीषण होती की, क्रुझर जीप ट्रॅव्हल्सला जोरात धडकली आणि त्यामध्ये क्रुझरच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघातावेळी क्रुझर खच्चून भरली होती. क्रुझरच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाल्याने या भागात बसलेल्या लोकांचे काय झाले असेल, याची कल्पना येऊ शकते. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी चार ते पाच वऱ्हाडी गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जमखंडीवरुन सावर्डेला निघालेल्या वऱ्हाडींनी आपल्यासोबत लग्नासाठी आणलेले साहित्य, रुखवत अपघातानंतर रस्त्यावर पडले होते. घटनास्थळी हे विदारक दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज गलबलून आले.
आणखी वाचा