एक्स्प्लोर

Sangli News: लाचखोरांचा हैदोस, विटा नगरपालिकेत गोमूत्र शिंपडले; लाचखोर मुख्याधिकाऱ्याविरोधात प्रचंड रोष

Sangli News: विटा शहरात लाचखोर मुख्याधिकाऱ्यांविरोधात संतप्त पडसाद उमटले. विटा नगरपरिषद कर्मचारी व नागरिकांनी गोमूत्र शिपडून नगरपालिका स्वच्छ करत या झालेल्या कारवाईचे स्वागत केले.

Sangli News: सांगलीतील विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर (Vinayak Aundhkar) काल (16 मे) तब्बल दोन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले होते. लाचखोरांची मग्रुरी दिवसागणिक वाढत चालली आहे. विटा शहरात लाचखोर मुख्याधिकाऱ्यांविरोधात संतप्त पडसाद उमटले. विटा नगरपरिषद कर्मचारी व नागरिकांनी गोमूत्र शिंपडून नगरपालिका स्वच्छ करत या झालेल्या कारवाईचे स्वागत केले.  

दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti Corruption Bureau) विनायक औंधकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. औधकर यांनी बांधकाम ठेकेदाराकडून इमारत बांधकाम परवानगीसाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. यातील दोन लाखांची लाच घेताना विटा नगरपालिकेचे औधकर याना रंगेहात पकडण्यात आले. तीन महिन्यांपूर्वीच विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी औधकर यांची नियुक्ती झाली होती. विटा शहरातील एका ठेकेदाराकडे एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील रोख रक्कम दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानुसार लाचलूचपत विभागाकडून मंगळवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली. 

तीन महिन्यांपूर्वी विटा नगरपालिकेत रुजू

तीन महिन्यांपूर्वी विनायक औंधकर यांची विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. विट्यात येण्यापूर्वी ते सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. विटा नगरपालिकेमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी वादग्रस्त ठरली. घटनेमुळे विटा नगरपालिकेसह सांगली जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लाचखोर विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांनी दोन लाखांची लाच घेताना सापडल्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची आता कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशीत त्यांचा काळाबाजार बाहेर येण्याची शक्यता आहे. औंधकरांना रंगेहाथ पकडल्याने बांधकाम व्यवसायिक आणि नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. विटामध्ये येऊन त्यांना तीन महिन्यांचा कालावधी झाला असला, तरी ते यापूर्वी कराडमध्ये कार्यरत होते. आता या ठिकाणी केलेल्या कारभाराची पण चौकशी होणार का? याकडे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या लाचेचा आकडा दिवसागणिक वाढतच चालल्याने सामान्यांचा संताप वाढत चालला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
Sangli District Bank Election : ‘प्रस्थापितांना हरवायचं असेल तर एकत्र लढावं लागेल’; चंद्रकांत पाटलांची अजित पवारांची राष्ट्रवादी अन् शिवसेनेला साद, नेमकं काय म्हणाले?
‘प्रस्थापितांना हरवायचं असेल तर एकत्र लढावं लागेल’; चंद्रकांत पाटलांची अजित पवारांची राष्ट्रवादी अन् शिवसेनेला साद, नेमकं काय म्हणाले?
Bhagyashrees Daughter Avantika Dassani Sangli: अभिनेत्री भाग्यश्रीच्या समर्थनार्थ लाडकी लेक मैदानात; पटवर्धन घराणं अन् सांगलीच्या मंदिरातील PHOTOs शेअर करत म्हणाली..
अभिनेत्री भाग्यश्रीच्या समर्थनार्थ लाडकी लेक मैदानात; पटवर्धन घराणं अन् सांगलीच्या मंदिरातील PHOTOs शेअर करत म्हणाली..

व्हिडीओ

Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime : अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा, बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
अंबरनाथमध्ये नाट्यगृहात पालिकेची सभा बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये शस्त्र सापडली,वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं खळबळ
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Aadhaar Card :  मोठी बातमी, दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय   
दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य, 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
अखेर 71 वर्षीय माजी खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल; एर्टिगा कारने दुचाकीला उडवलं, पती ठार, पत्नी जखमी
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
Video: प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात संजय राऊतांनी ठाण्यात जाऊन ठणकावलं; दोघांचं नाव घ्यावंच लागेल, कुणालाही सोडायचं नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 सप्टेंबर 2026 | बुधवार
Share Market : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, सेन्सेक्ससह निफ्टी घसरणीसह बंद, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget