Sangli : सांगली (Sangli Crime News) शहरातील वानलेसवाडी परिसरात चारित्र्यावर संशय घेत पतीने बेदम मारहाण करत चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून (Sangli Murder) केला. शिल्पा सदाप्पा कटीमणी (वय 25, रा. कक्केरी, जि. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत शिल्पा यांच्या आई मंजुळा ऊर्फ लक्ष्मीबाई शिवरुद्र दोडुमणी (रा. मूळ तळवारगीर, कर्नाटक, सध्या वानलेसवाडी, सांगली) संशयीत सिदाप्पा नागाप्पा कटीमणी (वय 30, रा. रा. कक्केरी, जि. बेळगाव) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. खुनानंतर (Sangli Wanalesawadi Murder) संशयीत सिदाप्पा पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. मृत शिल्पा कटीमणी यांचा विवाह कक्केरीमध्ये राहणाऱ्या संशयीत सिदाप्पा कटीमणी याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर संशयित सिदाप्पा वारंवार शिल्पावर संशय घेत होता. दारूच्या नशेत तो वारंवार मारहाण करत असे. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिल्पा सांगलीत वानलेसवाडी येथे बांधकामावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या आईकडे आल्या होत्या. गुरुवारी सिदाप्पा हा शिल्पाला घेऊन जाण्यासाठी वानलेसवाडीतील घरी आला. यावेळी शिल्पा यांनी त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. या रागातून त्याने शिल्पाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. रागाच्या भरात शिल्पावर चाकूने चार वार केले. पोटात चाकूचा वर्मी वार बसल्याने शिल्पा खाली कोसळल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. शिल्पा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून सिदाप्पा पसार झाला.
मृत शिल्पा कटीमणी यांचा विवाह सिदाप्पा कटीमणी - याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर - सिदाप्पा हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे, तसेच नशेत तिला वारंवार मारहाण करत होता. त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मृत शिल्पा या आठवड्यापूर्वी माहेरी सांगलीतील वानलेसवाडी येथे - आईकडे आल्या होत्या. संशयित सिदाप्पा हा पत्नी शिल्पा यांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या घरी आला. यावेळी शिल्पा यांनी त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. या रागातून त्याने शिल्पा कटीमणी यांना पुन्हा चारित्र्यावर संशय घेऊन दमदाटी आणि शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूने शिल्पा यांच्या शरीरावर चार वार केले, पोटात चाकूचा घाव बसल्याने त्या कोसळल्या. शिल्पा यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याने तेथून पळ काढला. चाकूचा वर्मी घाव बसल्याने शिल्पा यांचा जागीच मृत्यू झाला.
घडलेल्या घटनेनंतर कुटुंबीयांनी याची माहिती तातडीने विश्रामबाग पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिल्पा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठविला. या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून शहरचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना केल्या. संशयित सिदाप्पा कटीमणी हा पसार झाला असून विश्रामबाग पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी त्याच्या मूळगावी कर्नाटककडे रवाना झाले आहे
हे ही वाचा :
Sangli Crime : प्रेयसीने सोन्याची अंगठी मागितली, प्रियकराने गळा आवळून खून केला