सांगली: मुंबईतील रूग्णालयात गेल्या एक वर्षापासून मरणासन्न असलेल्या रूग्णाच्या शरीरात सांगलीतील रूग्णाच्या हृदयाची धडधड अवघ्या तीन तासात सुरू करण्यात आधुनिक वैद्यकशास्त्राच्या किमयेने शक्य झाले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा सांगलीतील उष:काल अभिनव इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सच्या (Ushahkal Abhinav Institute of Medical Sciences, Sangli) तज्ज्ञांनी केला. सांगलीतील उद्योजक रामानंद सत्यनारायण मोदानी यांचा मेंदूमृत झाल्याचे निदान उष:काल अभिनव रूग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. या रूग्णांचे अवयवदान (Organ Donation) केल्यास काही रूग्णांना पुन्हा आयुष्य जगण्याची संधी प्राप्त होऊ शकते असे सांगत रूग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांना राजी केले. यानुसार  हृदय मुंबईला धाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सांगलीहून खास रूग्णवाहिकेतून कोल्हापूरला  34 मिनीटात हे हृदय पाठवण्यात आले. तात्काळ त्याचे रूग्णावर प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रियाही हाती घेण्यात आली जी यशस्वी देखील झाली.


सत्तर पोलिसांचा ताफा, सुरूवातीला पोलिसांची गाडी, त्यानंतर रुग्णवाहिका, हृदय घेऊन असलेली रुग्णवाहिका आणि नंतर पोलिसांची गाडी. अवघ्या 34 मिनिटात कोल्हापुरात जात हृदय मुंबईला रवाना झाले. मेंदूचे काम थांबल्यान येथील सांगली मधील रामानंद सत्यनारायण मोदानी याच्या कुटूंबाने अवयवदानाचा निर्णय घेतला. 'ग्रीन कॉरिडॉर'ने हृदय कोल्हापुरातून खास विमानाने मुंबईला तर इतर अवयव रुग्णवाहिकेतून पुण्याला पाठविण्यात आले.


उद्योजक रामानंद सत्यनारायण मोदानी (वय 45) यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र ब्रेन डेड झाल्याने रुग्णालयाने कुटुंबीयांना विश्वासात घेत अवयवदानाचा प्रस्ताव मांडला. कुटुंबीयांनीही तो मान्य केल्यानंतर याबाबतची तयारी करण्यात आली. सांगली ते कोल्हापूर आणि सांगली ते पुणे या दोन मार्गांवर 'ग्रीन कॉरिडॉर' करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या मोदानी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे आणि ब्रेन डेड असल्याने कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. 


दुसरीकडे मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण वर्षभरापासून कृत्रिम श्वासावर असून, त्यांना हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याची माहिती रुग्णालयाकडे होती. त्यानुसार तिथे संपर्क साधत पुढील प्रक्रिया करण्यात आली. अवघ्या अडीच तासांत अवयव घेऊन हा ताफा पुण्यात दाखल झाला. पुण्यात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांना याचे प्रत्यारोपण केले जाणार आहे. तर सांगलीतील दोन रुग्णांसाठी नेत्र उपयोगात येणार आहेत.


हृदय ठराविक वेळेत मुंबईत पोहोचणे आवश्यक असल्याने कोल्हापूरच्या विमानतळावरून खासगी विमानाने ते पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सांगली कोल्हापूर मार्गावर सुरूवातीला पोलिस गाडी, मध्यभागी रुग्णवाहिका आणि त्यानंतर हृदय ठेवलेली रुग्णवाहिका, शेवटी पोलिस गाडी असा निघालेला ताफा 34 मिनिटांत कोल्हापूर विमानतळावर पोहोचला. त्यानंतर काही वेळातच विमान मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास हृदय प्रत्यारोपणांची प्रक्रियाही मुंबईत सुरू करण्यात आली जी यशस्वी झाल्याचे डॉक्टरानी सांगितलय.


एकाच व्यक्तीचे पाच अवयव दान करण्यात आले. यामुळे अवयव दान चळवळीमधील ही एक महत्त्वाची घटना असल्याचे अवयव दान केलेल्या कुटूंबातील व्यक्तीची देखील भावना आहे.आज आमच्या कुटुंबातील सदस्य शरीर रूपाने जरी जिवंत नसला तरी त्याच्या अवयव रूपातुन त्याची धडधड आणखी काही काळ सुरू राहील याची अभिमान असल्याचे कुटुंबाने भावना व्यक्त केलेत 


एकाच व्यक्तीचे त्याच्या कुटुंबाच्या संमतीने पाच अवयवाचे दान करण्यात आल्याने ही अवयव दान चळवळ मधील महत्त्वाची घटना मानली जातेय.


ही बातमी वाचा: