सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) शिराळा (Shirala) तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेमसंबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत पोलला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यामध्ये मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात फिर्याद दादासाहेब यांच्या पत्नी राजश्री यांनी दिली आहे. त्यानुसार कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील, शुभांगी प्रवीण पाटील, प्रवीण राजाराम पाटील, सनीराज संजय पाटील, संग्रामसिंह भालचंद्र पाटील, सचिन बाबुराव पाटील, अजय अरविंद पाटील (सर्व रा. मांगले) यांनी दादासाहेबांना मारहाण केली. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर सुरेश महादेव पाटील, संजय महादेव पाटील, रविंद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर (रा. मांगले) यांना अटक केली आहे.
लेकानं मुलगी पळवून नेली अन् जीव निष्पाप बापाचा गेला
दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. याच प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. त्यामुळे याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दादासाहेब चौगुले हे बुधवारी (17 जानेवारी) सकाळी त्यांच्या शेताकडे गेले होते. यावेळी संबंधित मुलीचे नातेवाईक सुद्धा त्याठिकाणी आले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे ते कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विद्युत खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दादासाहेब पत्नी राज्यश्री यांच्यासह मोटरसायकलवरून धार काढण्यासाठी त्यांच्या शेडमध्ये जात होते. यावेळी हे दोघे आल्याचे समजतात मुलीची नातेवाईक असलेले सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी दादासाहेब व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी कुठे आहे असे विचारणा केली. यावेळी त्यांनी आम्ही आत्ताच आलो आहे, आम्हाला काही माहिती नाही असे उत्तर दिलं. यानंतर सुरेश पाटील यांच्यासह पाच जणांनी दादासाहेब यांना डांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत ते बेशुद्ध पडले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या