सांगली : जयंत पाटील यांना साथ द्या त्याची उंची मोठी आहे, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी (Sharad Pawar on Jayant Patil) केले. ते सांगलीत (Sangli) लोकनेते स्व.राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार म्हणाले की, बापूंच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. बापूंबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि कर्तृत्ववान पिढी उभारणीसाठी त्यांनी मोठे काम केले. मंत्री म्हणूनही त्यांनी काम उत्तम केल्याचे गौरवउद्गार शरद पवारांनी काढले.
वसंतदादा सत्तेत होते आणि राजारामबापू सत्तेत नसायचे
वसंतदादा पाटील आणि राजारामबापू यांच्यात काही मतभेद झाले असे सांगत सांगली जिल्हा चमत्कारी वाटतो. काय करेल सांगता येत नाही. महाराष्ट्रच्या योगदानामध्ये सातारचे योगदान होते. त्यावेळी सातारामध्ये सांगली जिल्हा सुद्धा होता. सांगली हा यातना सहन करणारा जिल्हा आहे. वसंतदादा यांचे जसे योगदान होते, तसे राजारामबापू यांचे योगदान तेवढेच होते, पण वसंतदादा सत्तेत होते आणि राजारामबापू सत्तेत नसायचे अशी टिपण्णी सुद्धा शरद पवार यांनी या कार्यक्रमात केली.
आज केवळ मत्सराचे राजकारण सुरू
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राजारामबापू आणि वसंतदादा पाटील यांच्या काळात कोणताही व्यक्ती मत्सर करत नव्हता. आज केवळ मत्सराचे राजकारण सुरू आहे. विचारांचे राजकारण आज राहिलेलं नाही. एकमेकांचा वचपा काढायचे राजकारण सुरू आहे. राजकारण आज वेगळ्या वळचणीला गेलं आहे, साधनसंपत्ती जास्त असेल तिकडे लोक जात आहेत.
चौथा कार्यक्रम आहे हे कळले तर खैर नाही!
जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांचा हा दिवसातील चौथा कार्यक्रम आहे हे कळले तर काही खैर नाही. सुप्रिया सुळे यांनी तब्येतीमुळे शरद पवार यांचे दिवसातून आता एक किंवा दोन कार्यक्रम करायचे असे सांगितले आहे, पण शरद पवारांचा आजचा चौथा कार्यक्रम आहे. सुप्रिया सुळे यांना हे जर कळाले तर काही खैर नाही.
राजारामबापूंनी कामाच्या माध्यमातून कर्तृत्व उभे केले
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार विश्वजित कदम म्हणाले की, एका वेगळ्या भावनेतून पुतळ्याचे उद्घाटनासाठी सगळेजण उपस्थिती आहेत. शिक्षणानंतर राजकीय जीवनाचा प्रवास सुरु केला. कामाच्या माध्यमातून कर्तृत्व उभे केले. राजारामबापू यांनी राज्यात काम करत असताना वन, उद्योग खात्याच्या माध्यमातून मोठे काम केले. राज्याच्या अनेक भागात राजरामबापू यांनी काम केले आहे, त्याची प्रचिती अनेक ठिकाणी येते.
त्यांनी सांगितले की, राजारामबापू यांनी त्यांच्या काळात काढलेली वाळवा ते जत ही 250 किलोमीटरची पदयात्रा देशाच्या इतिहासात नोंद झाली आहे. राजारामबापू हे शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी काम करत राहायचं ,कधी विचारांशी त्यांनी तडजोड केली नाही आणि म्हणून ते मनात आहे. या जिल्ह्यातील पुढची पिढी सुद्धा या ठिकाणी तयार झाली आणि त्याच्याच माध्यमातून त्यांच्याच प्रेरणा घेऊन या ठिकाणी पुढे जात आहे. जिल्ह्यातल्या सार्वजनिक काम करणाऱ्या तरुण पिढीला देऊन गेलेल्या विचारांवर त्याच विचारधारावर निश्चितपणे काम करू.
इतर महत्वाच्या बातम्या