Sangli Crime: सांगलीत खुनांची मालिका सुरुच असून आता मायाक्का चिंचणी यात्रेत घोडा गाडी स्पर्धेत झालेल्या जुन्या वादावरून दाबेली विक्रेत्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. मिरज ते माधवनगर रस्त्यावरील यशवंतनगरमध्ये दाबेली गाडाचालक शुभम माने याचा धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. शुभमच्या छातीवर व डोक्यावर धारदार हत्याराने सात वार करण्यात आले. खून करून आरोपी फरार झाले होते, त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
शुभमच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी यश प्रशांत सौंदाडे (वय 18 वर्ष 10 महिने), प्रतीक संभाजी वगारे (19 वर्ष 3 महिने) अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. त्यामुळे या आरोपींचे वय पाहता गुन्हा करण्यासाठी एवढी क्रुरता आली तरी कोठून? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खून झाल्याची माहिती मिळताच कुपवाड व संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा प्रकार कुपवाड हद्दीत घडला असल्याचे स्पष्ट झाले. यशवंतनगर चौक ते आंबा चौक रस्त्यावर शुभम मानेचा दाबेलीचा गाडा होता. शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास गाड्यावर आलेल्या तरुणांनी शुभमशी वाद घातला. या वादातून हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर व इतरत्र वार केले. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाल्यानंतर हल्लेखोरांनी अंधारात पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या शुभमला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतू, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर यशवंतनगर चौकात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.
अल्पवयीन तरुणांकडून गुन्ह्याची मालिका
दरम्यान, अवघ्या सांगलीमध्येच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन मिरजेत अत्याचार केल्याची (Sexual Assault) घटना घडली होती. त्यानंतर तिचा गळा चिरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. हे भयंकर कृत्यही गांजाच्या नशेत 20 वर्षीय तरुणाने केलं होतं. प्रसाद मोतुगडे माळी (वय 20 वर्षे, राहणार ब्राह्मणपुरी मिरज) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याने पीडित मुलीचं रिक्षातून अपहरण केलं होतं. त्यानंतर तिला मिरजमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत तिला घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार करुन तिलाच्या गळ्यावर कटरने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
इतर महत्वाच्या बातम्या