सांगली : रात्रीच्या वेळी सांगली आणि मिरज स्टेशनवर प्रवासाला जायला आलेल्या प्रवाशांना एक वेगळाच अन् काहीसा भीतीदायक अनुभव आला. अचानक पोलिसांचे डॉग आणि बॉम्ब शोध पथक स्टेशनवर आले आणि त्यांनी संपूर्ण स्टेशनवरच झाडाझडती सुरू केली. शेवटी दोन्ही स्टेशनवर पोलिसांना काहीच आढळून आलं नाही आणि पोलिसांसह प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला. सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पण नंतर ते मॉकड्रीलचा भाग असल्याचं स्पष्ट झालं.
रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली आणि मिरज स्टेशनची सांगली पोलिसांकडून झडती घेण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस पथकाने सांगली रेल्वे स्टेशनची तपासणी केली. डॉग आणि बॉम्ब पथकाकडून रेल्वे स्थानकाची तपासणी करण्यात आली.
अचानक पोलीस फ़ौजफाटा आल्यामुळे आणि त्यांनी सुरू केलेल्या तपासणीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर सदर तपासणी मॉकड्रिल असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी माहिती दिली. या नंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना सुटकेचे निश्वास सोडला.
पुण्यातील एनडीए परिसरात सापडला बॉम्ब
शिवणे एनडीए परिसरात बाँब (Pune Bomb) सापडल्याने मोठी खळबळ (Pune news) उडाली. शिवणे एनडीए परिसराला लागून असलेल्या कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना एक बॉम्ब आढळला होता. पोलिसांनी बॉम्ब नाशक पथकाच्या साहाय्याने तो एनडीएच्या जंगलात नेऊन स्फोटकांच्या साहाय्याने त्याचा स्फोट घडवून आणला आणि बॉम्ब नष्ट केला. एनडीएसारख्या देशातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब सापडल्याने परिसरात भीती पसरली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एनडीए रस्त्यावरील कमळजाई मंदिर आहे, या मंदिराजवळच एका ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाच्या खोदकामादरम्यान दुपारच्या सुमारास मजुरांना बॉम्बसदृश्य वस्तू आढळली. यावेळी कामगारांनी घाबरून याबाबत ठेकेदाराला कळवले.हे सगळं पाहून ठेकेदाराने तत्काळ पोलिसांना सांगितले.
ही बातमी वाचा: