Sangli Rain : कोयना धरणातून केल्या गेलेल्या विसर्गामुळं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आताच्या घडीला पाणी पातळी 20 फुटांवर गेली आहे. एता रात्रीत नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारी म्हणून कोयनेतून एक हजार 50 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आलं आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
 
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळी एका रात्रीत दोन फुटाने वाढली आहे. दुसरीकडं  अलमट्टी धरणातून दीड लाखाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कृष्णेची पाणी पातळी स्थिर राहण्यास मदत होत आहे. कोयना धरणातून 1 हजार 50 विसर्ग सुरु आहे. तर दुसरीकडं वारणा धरणातून 851 क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. वारणा धरणात आज सकाळी 21.54 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 37.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 


सांगली, मिरज शहर व परिसरात गेल्या चोवीस तासापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. शहराच्या सखल भागात त्यामुळे पाणी साचून राहिले आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातही पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, या पावसामुळं शेतकऱ्यांना चांगलाचं दिलासा मिळाला आहे. शेतीच्या कामांन वेग आला आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी पूरससृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. 


महत्वाच्या बातम्या: