Raju Shetty : एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोध तर दुसरीकडे रत्नागिरी ते नागपूर  महामार्गाला आज (15 मार्च) होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राजू शेट्टींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस शिरोळ निवासस्थानी शेट्टींच्या घरी दाखल झाले आहेत .दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर मला पोलिसांनी नजर कैदेत ठेवलं असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करतील असा इशाराही त्यांनी दिलाय . (Raju Shetty)


नक्की प्रकरण काय?


शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील टोल नाक्यावर सांगली - कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला होता . रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कडाडून विरोध आहे .यासंदर्भात राजू शेट्टींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांच्या शिरोळे येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत .महामार्गात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींना चारपट मोबदला मिळावा यासाठी  शेतकऱ्यांची मागणी आहे .दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर मला पोलिसांनी नजर कैदेत ठेवले असल्याचं राजू शेट्टी म्हणालेत .स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्याने आंदोलन यशस्वी करतील .रत्नागिरी नागपूर महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र योग्य मोबदला द्यायला हवं .सरकार दडपशाही करत आहे मात्र आमचा लढा सुरूच राहणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितले .


रत्नागिरी नागपूर महामार्गातील शेत जमिनीचे शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्यावा ही प्रमुख पाहण्याचा सामान्य शेतकरी संघटनेने केले मुंबईत नुकतेच आंदोलन त्या ठिकाणी सांगली केलं होतं .सांगली कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको चा इशारा शुक्रवारी रात्री दिला होता .आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे .राजू शेट्टींच्या घरी ही पोलीस पोहोचले .राजू शेट्टींना नोटीस देण्यात आली .एकीकडे शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका असतानाच पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले .