Gaja Marne: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात MACOCA अंतर्गत कारवाई झालेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे(Gaja Marne) याला सांगलीच्या कारागृहात आणण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोथरूड परिसरात गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला त्याला बेदम मारहाण केली होती. मकोका अंतर्गत कारवाई करत 3 मार्चपर्यंत गजा मारणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता एवढ्या मोठ्या गुंडाला सांगलीच्या कारागृहात का हलवले? याचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. (Sangli)
नक्की प्रकार काय ?
पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे .सांगली कारागृहात त्याला नेण्यात आल्याने सांगली कारागृहाचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला .सांगली कारागृह प्रशासनाकडून मात्र याबाबत गोपनीयता बाळगली असून खबरदारी म्हणून गजा मारण्याची पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी सांगलीतील कारागृहात रवानगी केल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे .भाजप कार्यकर्त्याला कोथरूडमध्ये मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे याच्यावर मोक्का लावण्यात आला होता .त्यानंतर पुढे पोलिसांनी त्याला अटकही केली होती . सांगली कारागृहात गजा मारण्याची रवानगी करण्यात आली असून या कारागृहात चार बॅरॅक असून याच बॅरॅकमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे . त्याला ज्या कोठडीत ठेवण्यात आले आहे त्या बाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय .त्यामुळे कारागृह प्रशासन आता अलर्ट मोडवर आले असून कारागृहातील सर्व वॉट्स टॉवरवर बंदोबस्त आहे .कारागृहाच्या भिंतीवर कार्यन्वित असणारे इलेक्ट्रिक करंट कुंपण देखील सुरू करण्यात आले आहेत .
गजा मारणेचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 28 गुन्हे
कोथरूड परिसरात 19 फेब्रुवारी रोजी देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पुण्याचा कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या गजानन मारणे उर्फ गजा मारणेला पोलिसांनी अटक केली होती .दरम्यान तक्रारदार तरुणाने स्वतः कोर्टात हजर राहून कोणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र का दाखल केले आहे . गजा मारणेला पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता .गजा मारणे याच्यावर आत्तापर्यंत पुण्यातील डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तावाडी, पौड ,कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 28 गुन्हे दाखल आहेत .