एक्स्प्लोर

Sangli District Central Co-Operative Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश; जयंत पाटलांना धक्का?

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल तीनवेळा जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशीला स्थगिती देण्यात आली होती.

Sangli District Central Co-Operative Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल तीनवेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. बँकेतील नोकर भरतीतील घोटाळा, कर्ज वाटपातील अनियमितता, बँकेच्या कामकाजातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत आज राज्य सरकारने आदेश देत राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरतीपासून अन्य व्यवहारात गैर व्यवहाराचे आरोप होत असताना जयंत पाटील यांचे निकटवर्तीय दिलीप पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. बँकेतील नोकरभरती देखील दिलीप पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच झाली. या नोकरभरतीत देखील मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार आणि सध्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्या मानसिंगराव नाईक यांनीच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बँकेतील गैरकारभाराबाबतची तक्रार सहकार विभागाकडे केली होती. त्यावेळी दिलीप पाटील हे बँकेचे अध्यक्ष होते.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार आणि सध्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्या मानसिंगराव नाईक यांनीच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बँकेतील गैरकारभाराबाबत तक्रार सहकार विभागाकडे केली होती. त्यावेळी दिलीप पाटील हे बँकेचे अध्यक्ष होते. नोकरभरती, संगणक खरेदी, वनटाईम सेटलमेंट, नियमबाही कर्जवाटप, वाढलेला एनपीए आदींचा जिल्हा बँकेच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये समावेश आहे. सहकार विभागाने काहीवेळा चौकशी लावली, पण त्याला स्थगिती देखील देण्यात आली होती. 

नाबार्डसह थेट पंतप्रधानांकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराबाबत तक्रार करण्यात आली होती. बँकेतील अपहार, गैरव्यवहार, थकीत कर्जे, आदी मुद्यांच्या अनुषंगाने 2012 मध्ये बँकेवर प्रशासक नियुक्त झाले होते. यानंतर प्रशासकांनी तीन वर्षात बँकेची आर्थिक स्थिती पुन्हा भक्कम करीत 'अ' ऑडिट वर्ग मिळवून दिला. 2015 नंतर पुन्हा दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ सत्तेवर आले. या संचालक मंडळाने पूर्वीच्या कारभाराचा कोणताही बोध न घेता, नोकरभरती, फर्निचर, मालमत्ता खरेदी, टेक्निकल पदाची भरती, बोगस कर्जवाटप, संगणक खरेदी, रिपेअरी, वनटाईम सेटलमेंट आदीमध्ये मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार केला असा आरोप करण्यात आला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Embed widget