Prakash Ambedkar on Shiv Sena, Congress : आम्ही काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) आघाडी करायला तयार, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून प्रतिसाद नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलं आहे. तसेच, पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (Indian National Congress) निशाणाही साधला आहे. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. 


महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता : प्रकाश आंबेडकर


आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आला नाही. तर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.


देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. नेहरूंनी कबुतरं सोडली होती, मात्र ती वाढदिवशी सोडली नव्हती. मात्र मोदींनी वाढदिवशी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीच्या यात्रेवर देखील टीका केली आहे. भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्था 'त्या' दारुड्या सारखी : प्रकाश आंबेडकर


दारुड्याला दारू पिण्यास पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या दारुड्या सारखी अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीकडे घड्याळ नसेल तर त्यांचं 80 टक्के मतदान भाजपला जातं, तसंच काँग्रेसबाबत आहे. काँगेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढले की, भाजपला फायदा होतो आणि वेगळे लढले की भाजपला फटका बसतो. वेदांता प्रोजेक्टबाबत, गुजरात आणि त्या कँपनीमध्ये करार झाला आहे, आता कोणत्याही परिस्थितीत प्रोजेक्ट परत येणार नाही, असं सांगून आंबेडकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी फसवणूक बंद करावी आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा.