Maharashtra News : सांगली : पुण्यातील पूजा खेडकर प्रकरणानंतर सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांचा कारनामा समोर आलेला. सध्याचे महापालिकेचे आयुक्त चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळालेलं. अशातच आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मदतीसाठी खुद्द खासदार विशाल पाटील यांनी धाव घेतली आहे. सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आयएएस असल्यामुळे त्यांचा ठेकेदारी लॉबीला आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या टोळीला अडथळा ठरत आहे. म्हणूनच त्यांची पूर्वीची काही प्रकरणे उकरून काढून बदनामी सुरू आहे, असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. 


सांगली महापालिका (Sangli Municipality) आयुक्त शुभम गुप्ता (Shubham Gupta) यांची चौकशी करावी, जर चौकशीनंतर ते दोषी आढळले, तर त्यांना घालवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असं वक्तव्यही विशाल पाटील (Vishal Patil) यांनी केलं आहे. सांगली महापालिकेत कित्येक वर्ष या टोळीनं लुटायचं काम केलं आहे. ठेकेदार आणि काही पदाधिकाऱ्यांचं लॉबिंग आहे. ते कधीच इथे थेट आयएएस अधिकारी येऊ देत नाहीत. याबाबत नगरविकास विभागाशी संपर्क साधणार आहे, असंही खासदार विशाल पाटील यांनी म्हंटलं आहे.


आयएएस शुभम गुप्ता यांच्याबाबत खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले? 


गेल्या काही दिवसांपासून सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता कथिक भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. आदिवासी विकास प्रकल्प (Tribal Development Project) भामरागडमध्ये  प्रकल्प अधिकारी म्हणून शुभम गुप्ता असताना योजनेमध्ये मोठा घोटाळा केल्याचा ठपका ठेवला आहे. या संदर्भात शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदिवासी विभागानं सामान्य प्रशासन विभागकडे कारवाईसाठी अहवाल पाठवला आहे. अशातच आता शुभम गुप्ता यांच्या पाठीशी आता खासदार विशाल पाटील येऊन उभे राहिले आहेत. सांगली मनपा आयुक्त शुभम गुप्ताच्या विरोधातील जुना अहवालावरुन बदलीची मागणी करण्यामागे ठेकेदार टोळीच्या षड्यंत्राची शंका विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे. तसेच, आयुक्त दोषी आढळले तर मीच त्यांच्या बदली आणि शिक्षेसाठी प्रयत्न करेन, असंही खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. 


ठेकेदारी लॉबीला आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या टोळीला IAS शुभम गुप्ता यांचा अडथळा  


सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आयएएस असल्यामुळे त्यांचा ठेकेदारी लॉबीला आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या टोळीला अडथळा ठरत आहे. म्हणूनच त्यांची पूर्वीची काही प्रकरणं उकरून काढून बदनामी सुरू आहे, असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. तसेच आयुक्त गुप्ता यांची चौकशी करून ते दोषी आढळले तर त्यांना घालवण्यासाठी मी पुढाकार घेईन, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सांगली महापालिकेत कित्येक वर्षे या टोळीनं लुटायचं काम केलं आहे. ठेकेदार आणि काही पदाधिकाऱ्यांचं लॉबिंग आहे. ते कधीच येथे थेट आयएएस अधिकारी येऊ देत नाहीत. त्यांना ताटाखाली राहणारा अधिकारी लागतो. शुभम गुप्ता यांच्या महापालिकेतील कामात आक्षेप असतील तर जरूर चर्चा व्हावी, त्याची चौकशी व्हावी. त्यांच्या विरोधातील जुना अहवाल समोर आल्याचं कारण सांगून त्यांच्या बदलीची मागणी करण्यामागे टोळीचं षड्यंत्र आहे का? हे देखील तपासावं लागेल. येथे नॉन आयएएस अधिकारी आणून आपला हेतू साधायचा, हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. याबाबत नगरविकास विभागाशी संपर्क साधणार आहे, असंही खासदार विशाल पाटील यांनी म्हंटलं आहे.