Ladki Bahin Yojna: राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचे वेध लागले आहेत.  सरकार बदले की योजना बदलतात, त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अशीच सुरु ठेवायची असेल तर पुन्हा सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं सांगलीचे पालकमंत्री आणि मंत्री सुरेश खाडे यांनी महिलांना सांगितलंय. 


रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या मिरजमध्ये सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींचा देवाभाऊ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामवेळी बोलताना त्यांनी लाडकी बहिण योजनेसाठी हेच सरकार कायम ठेवण्याचं आवाहन केलं.


मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा देवाभाऊ देवेंद्र फडणवीस!


भारतीय जनता पक्षाचा रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींचा देवाभाऊ असा मेळावा भरवण्यात आला होता. यावर लाडकी बहिण योजनेचा लाभ असाच मिळण्यासाठी हेच सरकार पुन्हा यायला हवं. असे मंत्री सुरेश खाडे म्हणाले. यावेळी मागे लावण्यात आलेल्या बॅनरवर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ असं लिहिण्यात आलं होतं. लाडकी बहिण योजना अशीच सुरु ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला हवेत असंही खाडे पुढे म्हणाले.


काय म्हणाले सुरेश खाडे?


आशीर्वाद तुमच्या सगळ्यांना मिळाले पण एक लक्षात ठेवा, स्कीम चालू होणार, स्कीम चालू राहणार हे तुमच्यावर अवलंबून आहे. आमच्यावर नाही. ही स्कीम आपल्या घरातल्या पुरा बाळांसाठी आई-वडिलांसाठी राहतील पण ही योजना सुरू ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. शासन बदललं की योजना बदलतात. त्यामुळे शासन बदलू द्यायचं नाही. योजना चालू राहील. योजनेचे पैसे आम्ही पुढे वाढवू. यापुढे आपलं शासन आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा. असा आवाहन मंत्री सुरेश खाडे यांनी महिलांना दिलाय. दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्री लाडक्या बहिणींची योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो लागलेला असताना लाडक्या बहिणींचा देवाभाऊ, असे बॅनर चर्चेत आहे.


बहिणींना काहीतरी द्यायचं होतं म्हणून ही योजना सुरू..


तुम्हाला वंदनही करतो. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आलात. मी अनेक बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले आहेत. सरकारच्या, भावांच्या प्रती आदर पाहिला आहे. आता आणखी दुसरं काय पाहिजे. तुमच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. या योजनेबद्दल सर्वांशी चर्चा झाली. त्याची अंमलबजावणी कशी करायची. आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं हे पाहत होतो. तुम्ही प्रपंच चालवताना कसरत करता, तसं सरकार चालवताना आम्हाला कसरत करावी लागते. पायभूत सुविधांसाठी कर्ज घ्यावं लागतं, पगार असतो, पेन्शन असतं या सर्व गोष्टी करायच्या असतात. पण आमच्या बहिणींना काही तरी द्यायचं होतं. म्हणून ही योजना जाहीर केली, असंही शिंदे (Eknath Shinde) यावेळी म्हणाले आहेत.