MP Vishal Patil : अवघ्या पाच दिवसांपूर्वी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला जसा अजित अजित घोरपडेंशिवाय पर्याय नव्हता तसाच विधानसभेला देखील अजितराव घोरपडेंशिवाय पर्याय नाही अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी अजित घोरपडे यांच्या बरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. या विधानाने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या होत्या. आता या विधानाला पाच दिवस होत नाहीत तोपर्यंत याच मतदारसंघातील आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार रोहित पाटील यांना निवडून आणण्यासाठी विशाल पाटील यांनी वक्तव्य केल्याने विशाल पाटील यांच्या मनामध्ये आहे तरी काय? आणि ते नेमके कोणाचे आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Continues below advertisement


तासगाव तालुक्याने मला मदत केली 


लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी विजय मिळवला होता. या मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने आले होते. मात्र विशाल पाटील यांनी भाजप खासदार संजय पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा एकतर्फी पराभव करत विजयश्री खेचून आणली होती. तेव्हापासून खासदार विशाल पाटील यांची मतदारसंघांमधील भूमिका आणि वक्तव्ये चांगलीतच चर्चेत आहेत.  तासगाव तालुक्यातील सावळज गावचे सुपुत्र चंद्रकांत शिवाजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अणावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या होत आहे. अनावरण सोहळ्यामध्ये सोहळ्यासाठी जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील आदी नेते उपस्थित होते. 


यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. विशाल पाटील म्हणाले की जयंत पाटील साहेब तुम्ही सर्वांनी मला दिल्लीला पाठवलं आहे. शेवटी शेवट का असेना आम्हाला दिल्लीला जायची संधी मिळाली. दिल्लीच्या जबाबदाऱ्या आता पार पाडायच्या आहेत अंजनीकर आमच्या नेहमी मदतीला नेहमी येतात, पण तुम्ही महाविकास आघाीडीचे काम करा, असा आदेश असतानाही तासगाव तालुक्याने मला मदत केल्याचे विशाल पाटील म्हणाले.


रोहित पाटील टेन्शन घेऊ नका राजकारण चालू राहत असते


आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव महाकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे असल्याचे म्हणाले. रोहित पाटील टेन्शन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा स्वतः शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत कायम उभा राहील असा विश्वास सुद्धा विशाल विशाल पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या