Maharashtra Sangli News: सांगली जिल्ह्यातील (Sangli District) शिराळा तालुक्यातील (Shirala Taluka) बिऊर इथं भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात (Maharashtra Accident News) झाला. अपघातात दुचाकीवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सांगली (Maharashtra Sangli News)जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिऊर येथे भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या बाप लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आत्माराम पवार आणि त्यांची मुलगी तृप्ती पवार हे दोघेही एका घरगुती कामासाठी इस्लामपूर वरुन कोकरूडकडे निघाले होते. दुचाकीवरून जात असताना ते बीऊर येथे गेले असता समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं त्यांना धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले.
तृप्ती पवार ही इंजिनियर असून ती पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. सुट्टीनिमित्त काही दिवसांसाठी ती इस्लामपूर येथे आपल्या राहत्या घरी आली होती. वडिलांसोबत कोकरूड येथे कामानिमित्त जात असताना अपघात झाला आणि अपघातात बाप-लेकीचा मृत्यू झाला. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra Sangli News : नदीत बुडून दोन मावस भावांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी सांगलीतील (Maharashtra Sangli News) वारणा नदीत बुडून दोन मावस भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पोहता येत नसतानाही रणरणत्या उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी वारणा नदीत उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता. 27 मे रोजी शनिवारी ही घटना घडली. शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह शनिवारी सकाळी मालेवाडी जॅकवेलच्या ठिकाणी बचाव पथकाला सापडले. अमोल प्रकाश सुतार (वय 16) व रविराज उत्तम सुतार (वय 12) हे दोघेही नात्याने मावस भाऊ होते. हे दोघेही वैरण काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी वारणाकाठी असलेल्या शेतात गेली होती. सायंकाळपर्यंत मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी शोध घेतला असता नदीकाठी चप्पल, कपडे आणि मोबाईल या वस्तू आढळून आल्या. यामुळे मुलं नदीत उतरली असतील या शक्यतेनं शोध सुरू केला. मात्र, अंधार पडल्यानं शोध थांबविण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध सुरू केला. अखेर दुसऱ्या दिवशी दुपारी दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :