Buldhana Accident : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघातांचं (Accident News) सत्र काही थांबण्याचं नाव घेईना. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ (Buldhana News) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. बुलढाण्याजवळच्या देऊळगाव कोळ गावानजीक कारचा भीषण अपघात झाला. इम्पॅक्ट बॅरियरला धडकल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 


समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून घेतलेल्या उपाययोजनांनंतरही अपघात काही थांबण्याचं नाव घेईनात. आज बुलढाण्यातील देऊळगाव कोळ गावानजीक समृद्धी महामार्गावर भरधाव कार ईम्पॅक्ट बॅरियरला धडकून भीषण अपघात झाला. कारनं एवढ्या जोरात इम्पॅक्ट बॅरियरला धडक दिली की, कारनं जागीच पेट घेतला. गाडीला लागलेली आग एवढी भीषण होती की, गाडीतील प्रवाशांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही. या अपघातात दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी गंभीर जखमी असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्या जवळच्या देऊळगाव कोळ गावानजीक चेनेज 305 जवळ मुंबई कॉरिडरवर हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार नागपूरहून मुंबईकडे जात होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. गाडी कोणाची होती? तसेच, गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबतही अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे


अपघात एवढा भीषण होता की, गाडीनं जागीच पेट घेतला. आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मृतांची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. 


अपघात नेमका झाला कसा?  


बुलढाण्या जवळच्या देऊळगाव कोळ गावानजीक चेनेज 305 जवळ मुंबई कॉरिडरवर भीषण अपघात झाला. भरधाव गाडी अनियंत्रित होऊन इम्पॅक्ट रेलिंगवर जाऊन आदळली. त्यानंतर या गाडीला भीषण आग लागली. आग लागली त्यावेळी गाडीत तीन प्रवासी होते. त्यातील दोन प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 


पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. पण दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. मात्र एक प्रवाशी गंभीर जखमी होता. पोलिसांनी तात्काळ त्याला गाडीतून बाहेर काढलं आणि स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी प्रवाशावर उपचार सुरू आहेत.