Prateek Patil : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (Rajarambapu Patil Sahakari Sakhar Karkhana) अध्यक्षपदावर प्रतिक जयंत पाटील (Prateek Jayant Patil) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसे संकेतही मिळत आहेत. त्यामुळं राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाने प्रतीक जयंत पाटील यांची राजकीय एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. वडील जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत प्रतीक पाटील रुपात राजारामबापू पाटील यांच्या घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे.
प्रतिक पाटील यांची कारखान्याच्या अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची शक्यता
जयंत पाटील यांच्याप्रमाणेच प्रतीक पाटील यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा होतोय. कारण इस्लामपूरमधील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालक म्हणून निवड झालेल्या प्रतिक पाटील यांची आज कारखान्याच्या अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड प्रकिया पार पडणार आहे. यात प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होऊ शकते. जयंत पाटील यांच्याही राजकीय जीवनाची सुरुवात कारखान्याच्या माध्यमातूनच झाली होती. 1984 साली आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी हाती घेत केली होती.
जयंत पाटील तब्बल 37 वर्षानंतर संचालक मंडळातून बाहेर
जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, अध्यक्ष म्हणून झाला होता. 10 वर्षे जयं पाटील कारखान्याचे अध्यक्ष राहीले. जयंत पाटील यांनी नव्या पिढीला संधी देताना चिरंजीव प्रतिक पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणूनच व्हावा हा प्रयत्न दिसत आहे. नव्या पिढीकडे राजारामबापू कारखान्याची सत्तेची सूत्रे सोपवताना जयंत पाटील यांनी तब्बल 37 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. साठीकडे वाटचाल करणाऱ्या जयंत पाटील यांनी आता त्यांचे लक्ष्य चिरंजीव प्रतीक पाटील यांच्यासाठी मतदारसंघ सुरक्षित बनवणे, राज्य पातळीवर राजकारणमध्ये अधिक सक्रिय होणं याकडे दिसत असल्याचे दिसत आहे.
जयंत पाटील यांना प्रतीक आणि राजवर्धन ही दोन मुले आहेत. दोघांनीही इंग्लड मध्ये एम. बी.ए. ही व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेतली आहे. सुरुवातीला काही काळ दोघांचाही सार्वजनिक जीवनात वावर होता. मात्र, प्रतीक पाटील यांनी राजकारणात तर राजवर्धन यांनी व्यवसायात स्थिरावण्याचे ठरवले. शेतकरी मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून प्रतीक पाटील यांचे दौरे सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: