Jayant Patil सांगली : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बदलापूर घटनेच्या (Badlapur School Case) निषेधार्थ महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) सरकारला दिले. यानंतर आज महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) एक तास निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी इस्लामपूर मतदारसंघामध्ये सरकारविरोधात निदर्शने केली. बदलापूरमधील घटनेवरून जयंत पाटील यांनी राज्य सरकार (Maharashtra Government) आणि पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र डागले. 


छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून महायुती सरकारच्या विरोधात ही निदर्शने केली  गेली. महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर हा बंद मागे घेण्याची घोषणा आघाडीकडून रात्री करण्यात आली आहे. बंद मागे घेण्यात आला असला तरी तोंडाला काळ्या फिती बांधून महायुती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.


महाराष्ट्रातील पोलीस झोपलेल्या अवस्थेत 


जयंत पाटील म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील पोलीस (Police) झोपलेल्या अवस्थेत आहे. सरकारचे ऐकल्याशिवाय ते काही करत नाहीत. कोणती घटना घडली की, सरकारी पक्षाकडून कुणाचा फोन येतो का? याची पोलीस वाट पाहत आहेत. पण सरकारचे ऐकून देखील काही पोलीस अधिकारी निलंबित होतायत, त्यामुळे पोलिसांनी सरकारचे किती ऐकायचे हे लक्षात ठेवावे, असे त्यांनी म्हटले आहे.  


जयंत पाटलांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा


बदलापूर बंदचा नारा देत महाराष्ट्र एकवटायला लागला होता. पण सरकार अडचणीत आल्यावर काही विशिष्ट वकील समोर येतायत ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षणाबाबत देखील हेच वकील कोर्टात गेले होते, अशी टीका जयंत पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, सुप्रिया सुळेही डोक्यावर पदर घेऊन बसल्या, कोसळधारात 'निषेध आंदोलना'ची धग!


Sharad Pawar: स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच...; शरद पवारांचा भर पावसात इशारा