सांगली : आपला भाऊ गावच्या उपसरपंचपदावर विराजमान (Elder Brother Become Deputy Sarpanch) झाला आणि आपल्या कुटूंबाचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून उपसरपंचाच्या छोट्या भावाने थेट गावाला आणि गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा (Elder brother become deputy sarpanch younger brother helicopter circled the village) घालत आपला आनंद व्यक्त केला.
आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील बंधूप्रेम चर्चेत (younger brother helicopter circled the village)
सांगली जिल्ह्यातील (Sangli News) आटपाडी (Atpadi) तालुक्यातील करगणी (Kargani) गावातील भावावरचे हे बंधुप्रेम चर्चेत आले आहे. अंकुश खिलारे असे हेलिकॉप्टरने (younger brother helicopter circled the village) प्रदक्षिणा घातलेल्या भावाचे नाव आहे, तर साहेबराव खिलारे असे उपसरपंच झालेल्या भावाचे नाव आहे. अंकुश हे गलाई व्यावसायिक असून ते व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात असतात. त्यामुळे गावातील शेती-कुटूंबाची जबाबदारी जेष्ठ बंधू साहेबराव खिलारे यांच्यावर सोपविण्यात आलेली. मात्र, भाऊ शेती सांभाळत सांभाळत आज गावचा उपसरपंच झाल्याचे सेलिब्रेशन मात्र या भावाने मोठया थाटामाटात केले. यामुळे सर्वच जण अचंबित झाले होते.
कोणी गावचा सरपंच, उपसरपंच व्हावा ही या कुटूंबाची खूप वर्षांपासून इच्छा
गावावर तब्बल 3 ते 4 तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्यात आल्या. खिलारे कुटुंबातील कोणी ना कोणी गावचा सरपंच, उपसरपंच व्हावा ही या कुटूंबाची खूप वर्षांपासून इच्छा होती. 20 वर्षांपूर्वी दुर्योधन खिलारे यांच्या रूपात ही संधी थोडक्यात हुकली होती. मात्र, यंदा गावच्या उपसरपंच पदावर साहेबराव खिलारे यांची निवड झाली आणि खिलारे कुटूंबाचे स्वप्न पूर्ण झाले. एक स्वप्न पूर्ण झाले म्हणून साहेबराव खिलारे यांचे छोटे बंधू अंकुश खिलारे यांनी गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टर मधून प्रदक्षिणा घालण्याची इच्छा लाखो रुपये खर्च करून पूर्ण केली.
इतर महत्वाच्या बातम्या