चौफेर दिवाळी अंकाचे न्यूझीलंडमध्ये राजदूत नीता भूषण यांच्या हस्ते प्रकाशन

माजी गव्हर्नर जनरल डाॅ. नंद सत्यानंद, आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे न्यूझीलंड मधील उप समन्वयक दयानंद देशपांडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Continues below advertisement

सांगली : येथील 'चौफेर समाचार' या दिवाळी अंकाचे प्रकाशन वेलिंग्टन, न्यूझीलंड येथे  न्यूझीलंड मधील भारताच्या राजदूत नीता भूषण यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या पाच भारतीय भाषांना केंद्र सरकारने प्रदान केलेल्या अभिजात भाषेच्या दर्जाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका शानदार समारंभात हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. 

Continues below advertisement

माजी गव्हर्नर जनरल डाॅ. नंद सत्यानंद, आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे न्यूझीलंड मधील उप समन्वयक दयानंद देशपांडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मूळच्या सांगलीकर असलेल्या व सध्या न्यूझीलंडमध्ये कार्यरत असलेल्या संगीता देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत करुन 'चौफेर' या दिवाळी अंकाची माहिती दिली. गेली 24 वर्षे हा अंक सांगलीतून प्रसिद्ध होत असून अनेक नामवंत मराठी सारस्वतांचा या अंकामध्ये समावेश असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. नीता भूषण यांनीही अंकाची गुणवत्ता व एकूणच लेखनातील विविधता याविषयी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास बंगाली, आसामी आणि महाराष्ट्रीयन असोसिएशनचे अध्यक्ष, वेलिंग्टन इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष, अनेक मान्यवर उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola